पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या २४ तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येत्या २ व ३ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात ३ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवसांनी कोकणात तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या ३ ते ४ दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.गेल्या २४ तासात कोकणातील वेंगुर्ला १००, लांजा ६०, अलिबाग, देवगड, कणकवली, मालवण, म्हापसा, माथेरान, सावंतवाडी ५०, मुंबई (सांताक्रुझ), रामेश्वरी ४०, दोडामार्ग, कुडाळ, मुरुड, केपे, राजापूर, तळा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रातील इंदापूर ९०, मेढा ८०, अमळनेर, चोपडा, माळशिरस ६०, गगनबावडा ५०, दहिवडी माण, नांदगाव, पंढरपूर ४०, बार्शी, मालेगाव, मंगलवेढा, पारोळा, फलटण ३० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यातील गंगापूर ९०, कन्नड ५०, देवणी हदगाव, फुलंब्री, रेणापूर, सिल्लोड ४०, अंबेजोगाई, आष्टी, बीड, भोकरदन, चाकूर, गेवराई, पाटोदा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. याबरोबरच अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. विदभार्तील लोणार, मालेगाव, सिंधखेड राजा ३०, आमगाव, देऊळगाव राजा, दिग्रस, गोरेगाव, लाखंदूर, मंगळुरपीर, मानोरा, नांदगाव काजी, पातूर, रिसोड, साकोली, सावनेर २० मिमी पाऊस झाला होता.३० जून रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.१ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ २ व ३ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. .........इशारा : २ व ३ जुलै रोजी रायगड, रत्नगिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ पालघर, मुंबई, ठाणे, धुळे, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात ३ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात २ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून ३ जुलै रोजी पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, सातारा जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 7:33 PM
येत्या ३ ते ४ दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता
ठळक मुद्देरायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये २ व ३ जुलैला अतिवृष्टीचा इशारा