शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या शक्यता वाढल्या

By admin | Published: January 17, 2017 1:22 AM

दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपापल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोमवारी रात्री उशिरापर्यंत ‘आघाडी’च्या विषयावर जोरदार खलबते केली

पुणे : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपापल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोमवारी रात्री उशिरापर्यंत ‘आघाडी’च्या विषयावर जोरदार खलबते केली. महापालिका निवडणुकीत उभे राहिलेले भाजपाचे आव्हान परतून लावण्यासाठी आघाडी व्हावी, अशी भूमिका काही जणांकडून व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर या आघाडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरणार असून, त्याचे डॅमेज कंट्रोल कसे करायचे, याचीही चर्चा दोन्ही पक्षांकडून करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आघाडीसंदर्भात सोमवारी रात्री नऊ वाजता बैठक घेतली, तर काँग्रेसची बैठक युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या बंगल्यावर रात्री दहा वाजता सुरू झाली.दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठकांमध्ये आघाडी केल्यामुळे कुठे फायदा होईल, काय नुकसान होईल यावर चर्चा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या काय भावना आहेत, ते जाणून घेण्यात आले. आघाडीनंतरच्या वेगवेगळ्या समीकरणांवर चर्चा करण्यात आली. आघाडीचा फायदा कुणाला जास्त होईल याचाही अंदाज जाणून घेण्यात आला. यंदाच्या निवडणुकीत भाजपाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी आघाडी करून लढणे योग्य ठरेल, अशी भावना दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला ७१-९१ जागांचा प्रस्ताव देण्यात आला. त्यामध्ये काँगे्रसला ७१ तर राष्ट्रवादीने ९१ जागा लढवाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रस्तावावर विचार करण्यात येत असून, त्यांच्याकडून ५२-११० जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये काँग्रेस ५२ तर राष्ट्रवादी ९१ जागा लढवेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.