पुणे/मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते़ विदर्भात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून बुधवारी तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़उष्णतेमध्ये वाढ झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आली. राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४०़१ अंश नोंदविले गेले़उत्तर भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे़ उत्तराखंड, पंजाब अशा अनेक शहरांमध्ये जोराचा पाऊस झाला आहे़ पुढील दोन ते तीन दिवस हा पाऊस राहणार आहे़ (प्रतिनिधी)
राज्यात गारपिटीची शक्यता
By admin | Published: March 14, 2016 2:39 AM