शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

अकोल्यातील कुरणखेडची चंडिका माता

By admin | Published: October 03, 2016 11:43 AM

कुरणखेड गावाच्या बस थांब्यापासून दक्षिणेस काटेपूर्णा नदीच्या काठावर २ कि. मी. अंतरावर उंच टेकडीवर हिरवळ वृक्षांच्या छायेत चंडिकामातेचे मंदिर असून तेथे मातेचे वास्तव्य आहे

संजय तायडे / ऑनलाइन लोकमत
बोरगाव मंजू, दि. 3 - राष्ट्रीय महामार्गावर स्थित कुरणखेड हे संमिश्र वस्तीचे गाव. याच गावाच्या बस थांब्यापासून दक्षिणेस काटेपूर्णा नदीच्या काठावर २ कि. मी. अंतरावर उंच टेकडीवर हिरवळ वृक्षांच्या छायेत चंडिकामातेचे मंदिर असून तेथे मातेचे वास्तव्य आहे. याच ठिकाणास ढगादेवी म्हणून पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात व विदर्भातही ओळखले जाते. हे तीर्थस्थान भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. 
 
चंडिकामातेच्या बाबतीत अनेक कथा व एक सुवर्ण इतिहास आहे. आजही प्राचीन काळात हे गाव कुचनपूर म्हणून ओळखले जात होते. याचेच नाव पुढे कुरणखेड उदयास आले व ते प्रचलित आणि नावलौकिक झाले. या संदर्भात एक कथा रूढ आहे,  कुचनपूरचा राजा नरेश हा देवीचा भक्ता होता. तो या टेकडीवर घनदाट जंगलात नेहमी यायचा. एकदा त्याला या टेकडीवर घनदाट अरण्यात निर्मनुष्य मातेचे वास्तव असलेल्या जंगलात मातेच्या आसपासची जागा स्वच्छ दिसायची. हे सत्य व वास्तव्य चमत्कार जाणून घेण्यासाठी कुचनपूर रजा नरेश एके दिवशी भल्या पहाटे तिथे आला असता एक सिंह आपल्या शेपटीने ती जागा स्वच्छ करीत असल्याचे त्यांना दिसले. हे पाहून राजा नरेश आश्चर्यचकित झाला. तेव्हापासून या चंडिका मातेच्या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली गेली असावी,अशी अख्यायिका आहे.  या मंदिराचा इतिहास २०० वर्षांपेक्षा जास्त असावा. याच प्रकारचे मंदिर ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे असल्याचे अभ्यासक सांगतात. आद्यपूजारी व्यंकटेश कोठोंबा भोसले यांनी ३० वर्ष सेवा केली. पुढे १९९२-९३ मध्ये येथील स्व. डॅडी देशमुख व बोरगाव मंजू निवासी पुरुषोत्तम अग्रवाल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या पायथ्याशी टेकडी, मोठमोठे सभामंडप असे भव्य मंदिर उभे केले. अश्विन व चैत्र महिन्यात नवरात्रात येथे हजारो भाविक येत असून दररोज कार्यक्रमाची रेलचेल राहते.
 
या मंदिराच्या उत्तरेस १२१ पायºया असून प्रवेशद्वाराजवळ भैरवजी महाराज कुंड, ३१ फूट उंच सभामंडप, गौरक्षण संस्था, आसरामाता मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, दुमजली भक्तिनिवास, भोजन सभागृह इत्यादी  दृष्टीस पडतात.े.या मंदिराच्या उत्तरेस १२१ पायºया असून प्रवेशद्वाराजवळ भैरवजी महाराज कुंड, ३१ फूट उंच सभामंडप, गौरक्षण संस्था, आसरामाता मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, दुमजली भक्तिनिवास, भोजन सभागृह इत्यादी  दृष्टीस पडतात. येथे वर्षभर विविध धार्मिक प्रासंगिक कार्यक्रमांची रेलचेल असते. टेकडीवर वृक्षांच्या गराळ्यात मातेचे मंदिर, पायथ्याशी उत्तरेकडे वाहणारी काटेपूर्णा नदी, या सर्व निसर्गरम्य वातावरणात भक्त तल्लीन होतात. तसेच नवरात्र उत्सवादरम्यान नऊ दिवस लहान-मोठे व्यापारी प्रसाद, इतर खेळणीसह आपले दुकाने थाटून याच परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. याच महामार्गावर डोंगरगावची अंबामाता फाट्यावरून दक्षिणेस एक कि. मी. अंतरावर असल्यामुळे भाविक एकाच वेळेस दोन्ही मातेचे दर्शनाचा लाभ घेतात.
 
संस्थानाचे पदाधिकारी प्रशांत देशमुख, काटेपूर्णा निवासी व रामूसेठ अग्रवाल बोरगाव मंजू निवासी यांच्या देखरेखीत नऊ दिवस नवरात्र उत्सव होत असून दररोज सकाळ-संध्याकाळ मातेच्या महाआरतीसह भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येतो. अष्टमीला होमहवन व नवमीला भव्य महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात येते.