शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

'अनिल देशमुखांनी दरोडा घालायचा आणि पोलिसांनी हार घालून स्वागत करायचं का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 3:11 PM

Chandrakant Patil slams Anil Deshmukh: 'अनिल देशमुखांची संपत्ती उगाच जप्त होत नाहीये.'

अमरावती: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'अनिल देशमुखांनी दरोडा घालयचा आणि पोलिसांनी त्यांना अटक करायची नाही, तर काय हार घालयचा का?' अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. चंद्रकांत पाटील आजपासून दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत. 

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, 'राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना यांना क्लिन चिट मिळाली, अशा चर्चा सुरू आहेत. पण, सध्या त्याची चौकशी होत आहे. तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी अटक करायची नाही, तर काय हार घेऊन स्वागत करायचं का? या या उत्तम दरोडा घातला असं म्हणायचं का?' अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच, सीबीआयने काय करावं हा माझा विषय नाही. अनिल देशमुख यांची संपत्ती धडधड जप्त होतीये, ती उगाच होत नाहीये,' असही पाटील म्हणाले.

भाजपाचा स्वबळाचा नारा...यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवरही टीका केली. तसेच, आगामी निवडणुकीसाठी भाजपाचा स्वबळाचा मार्ग असल्याचही म्हणाले. 'सध्या भाजपाचा प्रवास स्वबळाचा आहे. आम्हाला आता कुणाकडूनही फसवलं जायचं नाहीये. आम्ही एकट्याच्या जीवावर लढणार आहोत. ही शिवसेना कुठं होती? मुंबईत होती. शिवसेनेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन मराठवाडा विदर्भात आणलं आणि आता 56 वर तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात आणि 105 वाल्याला टाटा, बाय-बाय केलं. त्यामुळे आम्हाला कुणाबरोबरही लढायचं नाही', असं ते म्हणाले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस