शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

'उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी पत्रकार परिषद रद्द केली, तेव्हाच आम्हाला संशय आला होता...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 3:15 PM

Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray: आधी मोदींच्या नावाने मतं मागायची आणि जिंकून आल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचं.'

अमरावती:भाजपासोबतची युती तोडून शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. या गोष्टीची सळ अजूनही भाजप नेत्यांच्या मनात आहे. ती वेळोवेळी भाजप नेत्यांच्या तोंडून बाहेर पडतच असते. आता परत एकदा भाजपा नेत्याने तो विषय उकरुन काढला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर पाठित खंजीर खुपसल्याची टीका केली आहे. चंद्रकांत पाटील आजपासून दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत.

 

ऐनवेळी पत्रकार परिषद रद्द केलीते पुढे म्हणाले की, विधानसभा निकालाच्या 4 वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी मी पुण्यातून येत होतो. पण, उद्धव ठाकरेंनी 4 वाजताची पत्रकार परिषद तुमची तुम्ही करा आणि माझी मी करतो असं म्हटले. तिथेच गडबड झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी सर्व मार्ग मोकळे आहेत असं म्हटलं. त्यांना वेगळाच मार्ग निवडायचा होता, तर आधी युती का केली ? विधानसभा निवडणुकीआधी युती करायची, मोदींच्या नावाने मते मागायची आणि जागा जिंकून आल्या की काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचं. सेनेनं विश्वासघात केला, विश्वासघाताचंच नाव पाठित खंजीर खुपसणं आहे, त्यात मी चुकीचं काय बोललो ?, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेनेला भाजपाने मराठवाडा-विदर्भात मोठं केलंपाटील पुढे म्हणाले की, सध्या भाजपाचा प्रवास स्वबळाचा आहे. आम्हाला आता कुणाकडूनही फसवलं जायचं नाहीये. आम्ही एकट्याच्या जीवावर लढणार आहोत. ही शिवसेना कुठं होती? मुंबईत होती. शिवसेनेला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन मराठवाडा विदर्भात आणलं आणि आता 56 वर तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात आणि 105 वाल्याला टाटा, बाय-बाय केलं. त्यामुळे आम्हाला कुणाबरोबरही लढायचं नाही, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिन