बारामती
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून चंद्रकांत पाटील यांना असह्य झाले आहे. आपल्या जागा जास्त आल्या तरी आपले सरकार स्थापन होऊ शकले नाही याची बोचणी त्यांना लागून आहे. या मानसिकतेतून ते बाहेर यायला तयार नाहीत. महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार पडेल, असे विधान त्यांनी झोपेत असतानाच केले की जागे असताना केले. असा मिश्किल सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला.बारामती येथे शनिवार (दि. २९) उपमुख्यमंत्री अजित यांच्या अध्यक्षते खाली कोरोना आढावा बैठक झाली. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदप पवारव शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ते आपल्या निर्णयाशी ठाम आहेत. तोपर्यंत या सरकारला कसलाही धोका नाही, असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत इतर कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लागता खबरदारी राज्य सरकार घेत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे. ते मराठा आरक्षणाबाबत अभ्यास करत आहेत. राज्य सरकार सर्वच जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे. कोरोना काळात शेती व्यावसायाने देशाचा जिडीपी टिकवला आहे. खरिपाच्या अनुषंगाने शेती उपयोगी औषधे, अवजारे व खतांची दुकाने उघडण्यास परवाणगी देण्यात आली आहे.
-------------------------------
तिसºया लाटेच्या अनुषंगाने खबरदारी घेण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जेवढ्या अडचणी आल्या त्या अडचणी येऊ नयेत यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. परदेशातील लसींना तातडीने परवाणगी देण्यात यावी. तसेच या लसी मिळवण्यासाठी केंद्राने प्रयत्न केले तर लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे,असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बारामती येथील रूई ग्रामीण रूग्णालयामध्ये म्युकर मायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव आला आहे. ज्या त्या भागातील रूग्णांनी आपआपल्या भागात उपचार घेतल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही. मात्र कोणत्याही भागातील रूग्ण कोठेही उपचार घेऊ शकतात. तो रूग्णाचा अधिकार आहे. त्यामुळे या साथ रोगावर दर्जेदार उपचार देण्यासाठी आरोग्य विभाग व शासन सकारात्मक आहे, असेही यावेळी पवार म्हणाले.