शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती - अजित पवार

By admin | Published: February 16, 2016 8:20 PM

दुष्काळी परस्थितीत बेताल वक्तव्य करणारे कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित

- अधिवेशनात विरोधी पक्ष मिळून सरकारला जाब विचारू
 
तासगाव : दुष्काळी परस्थितीत बेताल वक्तव्य करणारे कोल्हापूर-सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी तोफ डागली.
हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका करुन नऊ मार्चपासून सुरू होणा:या अधिवेशनात विरोधी पक्षातील सर्व सहकारी मिळून दुष्काळासह विविध प्रश्नांना वाचा फोडू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीसाठी अजित पवार अंजनी (ता. तासगाव) येथे आले होते. पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्य सरकारवर टीकची झोड उठवली. 
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजना पाच कोटींच्या निधीसाठी ठप्प आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केल्यानंतर, त्यांनी सरकारकडे नोटा छापायचे मशीन नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारले असता, पवार म्हणाले की,  सत्तेची मस्ती आल्यामुळेच ते बेताल वक्तव्य करत आहेत. जनता अशी मस्ती कधीही उतरवू शकते. जनतेला पाणी द्यायला हवे. शासनाने अडवणुकीचे धोरण राबवून चालणार नाही.
अडचणीत असणा:या जनतेला सावरण्याकरता सरकारने धाडसाचे निर्णय घ्यायचे असतात. परंतु हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने निर्णय घेत नाही. विदर्भ, मराठवाडय़ात भीषण दुष्काळ आहे. जनावरांच्या चा:याचा यक्षप्रश्न आहे, तरीदेखील छावण्या सुरू नाहीत. त्यामुळे हे सरकार कोणाचा आणि कसा विचार करत आहे, याचे तारतम्य राहिलेले नाही. लोकहिताच्या योजना बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात आहे. मात्र अशा योजना प्रभावीपणो राबविणो आवश्यक आहे, हे शासनाकडून होत नाही, असेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 
 
आगीच्या घटनेची चौकशी व्हावी... 
मंत्रलयात आग लागली तेव्हा ही आग आम्हीच लावली, असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून होत होता. आता भाजप सरकारच्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात स्टेजला आग लागली. मात्र ही आग त्यांनीच लावली, असा आरोप आम्ही करणार नाही. अशा घटना काही त्रुटींमुळे होत असतात. त्याची चौकशी व्हायला हवी.
- अजित पवार