जागतिक दर्जाची नेमबाज तेजस्विनी सावंतला तिच्या खेळात चंद्रकांत पाटील यांनी केलंय मोलाचं सहकार्य.जागतिक दर्जाची नेमबाज तेजस्विनी सावंत हीच्या यशामागे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचादेखील मोलाचा वाटा आहे. ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी गप्पा मारल्या. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी हा किस्सा उलगडला.
"२००४ मध्ये तेजस्विनी सावंत हीनं नेमबाजीला सुरूवात केली. त्यानंतर हळूहळू तिलाही काही मेडल्सही मिळू लागली. त्यानंतर तेजस्विनीनं, तिच्या आई-वडिलांनी माझ्याशी संपर्क साधला. आपल्याला जर काही मदत मिळाली तर आणखी पुढे जाता येईल, असं तिनं सांगितलं. त्यावेळीही एक गन घ्यायची म्हटलं तर त्याची किंमत पावणे दोन लाख रूपये होती. सध्या त्या गनची किंमत ८ लाख रूपये आहे. मी माझ्या परीनं मदत करत गेलो आणि तिनंही त्याचं सोनं केलं," असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी तिचं कौतुक केलं.