राजकीय जीवनात आमदारकी मिळाली ती नितीन गडकरी यांच्यामुळे मिळाली असल्याचं वक्तव्य माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील केलं. "जावडेकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील परंपरागत जागा गेली ती तुमच्या जनसंपर्कामुळे खेचून आणू शकता असं म्हणत त्यांनी थेट घोड्यावरच बसवलं. त्यावेळी निवडणूक हा विषयदेखील कळत नव्हता," असा किस्सा पाटील यांनी सांगितला ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से पाटील मनमोकळेपणानं बोलले.
चर्चेदरमयान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचादेखील आपल्या राजकीय जीवनात मोलाचा वाटा असल्याचं पाटील यांनी सांगितलं. "कर्तृत्व हा भाग बाजूला केला तर सरकार असताना मला जे काही मिळालं ते अमित शाह यांच्यामुळेच मिळालं आहे. याबाबत आपल्या मनात तिळमात्र शंकाही नाही," असं ते म्हणाले. विधान परिषदेचा नेता कोण व्हावा याबाबत अमित शाह यांच्या मनात कोणताही संदेह नव्हता. वरच्या सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटीलच बनतील असं अमित शाह यांनी सहजरित्या देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनाही त्यात काही समस्या नव्हतीच. २०१४ ते २०१९ या कालावधीत मला जे काही मिळालं त्यासाठी जी एक साथ आवश्यक होती ती देखील अमित शाह यांनी दिल्याचे ते म्हणाले.
रुग्णांच्या सेवेची 'सावली'"सावली नावाच्या एका संस्थेचं मोठं काम करण्याचं भाग्य मला लाभलं. बेडवर असलेल्या रुग्णांची सेवा करण्याचं काम या संस्थेद्वारे करण्यात येतं. त्यावेळी एका भाड्याच्या बंगल्यामध्ये ९० जणांची व्यवस्था करत होते. त्यावेळी मी त्यांना इमारत बांधण्याचा सल्ला दिला. परंतु इमारत कशी बांधायची हा प्रश्न होता. नंतर आम्ही घरोघरी डबे दिले आणि त्यात रद्दी विकून पैसे टाकण्याचं आवाहन केलं. जेव्हा डबा उघडला जाईल तेव्हा त्यात जितके पैसे असतील तितके आपण टाकू आणि संस्थेला एक इमारत बाधून देऊ असं ठरवलं. परंतु त्यानंतर आमचं सरकारही आलं. आता ६ मजल्यांची त्या ठिकाणी १६० रूग्णांची सेवा करणारी सावली उभी झाली," असं पाटील यांनी सांगितलं.