कोल्हापूर : भाजपच्या सांगण्यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केल्याचा आरोप आपण केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंभर कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे वक्तव्य केले. आपले त्यांना सांगणे आहे, त्यांनी वेळ दवडू नये, आजच दावा दाखल करावा, असे उघड आव्हान ग्र्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, अंबानीच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकातील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर करावे, या प्रकणात जे आरोप आहेत, त्यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची चौकशीच कशी होऊ शकते? राज्य सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान भाजपचे सुरू असल्याचे आपण म्हटले होते.
त्यावर चंद्रकांत पाटील यांनी दाव्याची धमकी दिली आहे, त्यांनी दावा दाखल करावाच, दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊदे. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणूकीतील आरोपाबाबत आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर शंभर कोटीचा दावा दाखल केला आहे, तो जिल्हा सत्र न्यायालयात चालू असल्याची आठवणही मंत्री मुश्रीफ यांनी करून दिली.सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ह्यएसआयटीह्ण ने तपास पुर्ण करत आणला असताना तो एनआयए कडे दिला. आताही स्फोटकांचा तपासाचा मुंबई पोलीसांनी छडा लावला होता, त्यातील नावे बाहेर येणार होती, तोपर्यंत हाही तपास एनआयए कडे दिला. या देशात चालले तरी काय? तपास देऊन काय? हाती लागले, सुशांतसिंग व वाझे प्रकरणात एनआयए पुर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतींना चिंतादेशात कोरोनाचे संकट भयावह झाले आहे. अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे येत तरीही या मंडळींना राजकारण सूचते. केंद्र सरकार गेली सहा महिने काय करत होते? असा प्रश्न खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीनीच केला आहे. आता एकमेकावर टीका करत बसण्याची वेळ नाही. राज्य सरकार लस व रेमडिशिवर खरेदीचे ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.कायदा बदलण्यापेक्षा साखरेचा दर वाढच योग्यएफआरपीचा कायदा बदलणे कठीण आहे. त्यापेक्षा केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ करून तो प्रतिक्विंटल ३४०० रूपये करणे अधिक उचित ठरेल. साखर कारखान्यांनी ऑक्सीजन प्रकल्प उभारणीबाबत २ मे नंतर बैठक घेणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.