अकोला: आज 3 सप्टेंबर रोजी बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान झालं, 6 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बेळगाव महापालिकेत 30 पेक्षाही अधिक जागा जिंकू, असा दावा केला. राऊतांच्या या दाव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला. ओबीसींना आरक्षण देणं खूप सोपं आहे. पण या सरकारला आरक्षण द्यायचं नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच, त्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही निशाणा साधताना अनिल परबांचे घोटाळे नवे नसून, जुनेच घोटाळे आहेत, असं म्हटलं.
भाजप 45+ जागा जिंकणारआज बेळगाव महापालिकेसाठी मतदान झालं. पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांकडून ही निवडणूक लढवली जात आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल, आम आदमी पार्टी व एमआयएम या पक्षाचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. आज होत असलेल्या निवडणूकीत बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर विराजमान होणार असून आम्ही 45 प्लस जागा जिंकू, असा दावा बेळगाव दक्षिण आमदार अभय पाटील यांनी केला आहे.