- यदु जोशीमुंबई - पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे त्यांच्याकडील कृषी व फलोत्पादन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी जाण्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविले.कृषी खात्याचा कारभार क्रमांक २चे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्रीही आहेत. मुख्यमंत्री १६ जूनला परदेश दौऱ्याहून आल्यानंतर ४ जुलैपासून नागपुरात सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विस्तारानंतर कृषी मंत्रीपद अन्य कुणाला दिले जाईल.सूत्रांनी सांगितले की, अनेक महिन्यांपासून रखडलेल्या महामंडळांवरील नियुक्त्यांचा मार्गही मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या नियुक्त्यांवर शेवटचा हात फिरविला आहे. या नियुक्त्यांची यादी जाहीर करण्याचे अधिकार चंद्रकांत पाटील यांना दिलेआहेत. पाटील बुधवारी मुंबईत परतल्यानंतर त्यांची घोषणा होईल, अशी शक्यता आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी परदेश दौºयावर रवाना होण्यापूर्वी वरिष्ठ आयएएस तसेच आयपीएस अधिकाºयांच्या मोठ्या प्रमाणात बदल्यांना मान्यता दिली असून, सोमवारी त्या होतील, असेही सूत्रांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषी मंत्रालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 6:10 AM