Balu Dhanorkar: चंद्रपूर: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दोन दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 07:25 AM2023-05-30T07:25:08+5:302023-05-30T07:26:26+5:30

Balu Dhanorkar Death: आज वरोरा येथे अंत्यदर्शन उद्या अंत्यसंस्कार;  समर्पित सेना कार्यकर्ता ते काँग्रेस खासदार केला प्रवास

Chandrapur Congress MP Balu Dhanorkar passed away; his Father lost two days ago | Balu Dhanorkar: चंद्रपूर: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दोन दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपलेले

Balu Dhanorkar: चंद्रपूर: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दोन दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपलेले

googlenewsNext

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता निवासस्थानी आणण्यात येणार आहे.

आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर  31 मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षांच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्क करणारा प्रवास केला आहे. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला होता. 2009 साली शिवसेनेच्या तिकीटावर त्यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. २०१४ ला ते पुन्हा शिवसेनेच्या तिकीटावर लढले आणि आमदार झाले. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेसचा पराभव झालेला असताना बाळू धानोरकर यांनी विजयश्री खेचून आणत राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार बनले. 

शुक्रवारी त्यांना 26 मे रोजी नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवार 30 मे रोजी पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले. आता पुन्हा अचानक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read in English

Web Title: Chandrapur Congress MP Balu Dhanorkar passed away; his Father lost two days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.