चंद्रपूर - चिमूर शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर त्याच वार्डात राहणाऱ्या दोन आरोपीने काही दिवसा अगोदर अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. यानंतर पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रशीद रुस्तम शेख व दुसरा आरोपी नसीर वजीर शेख या दोघांना अटक करण्यात आली.
शहरातील वस्तीत राहणाऱ्या पीडित मुलीचे आई-वडील रोजमजुरी करून परिवार चालवितात. पीडित दोन्ही मुलीचे घर एकमेकाशेजारी आहे. दोन्ही पीडित मुली मैत्रिणी आहेत तर त्याच वॉर्डात राहणारे आरोपी रशीद रुस्तम शेख (नडेवाला) यांनी ओळखीचा फायदा घेत खाऊ देण्याचे आमिष दाखवून मार्च महिन्यात घरी बोलावून दोन्ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी दुसरा आरोपी नसीर वजीर शेख (गोलेवाला) यानेही खाऊचे आमिष दाखवून घरी बोलावून अत्याचार अत्याचार केला. हा प्रकार दोन्ही मुलीसोबत सप्टेंबर महिन्यापासून सुरु असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना तक्रारीत सांगितले. चिमूर पोलिसांनी रात्री दोन्ही आरोपीना अटक करून ताब्यात घेतले असून ठाणेदार संतोष बाकल पुढील तपास करीत आहेत. सध्या शहरात शांतता आहे.संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला घेरावअल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना माहिती होताच शेकडो नागरिक पोलीस ठाण्यावर धडकले व आरोपीला फासीची शिक्षा द्या, अशा घोषणा देत होते. घटनेचे गांभीर्य ओळखत ठाणेदार संतोष बाकल यांनी जास्तीची पोलीस कुमक बोलावून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.पोलीस ठाण्यासमोर टायर जाळून निषेधअल्पवायीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचा निषेध करीत संतप्त जमावाने पोलीस ठाण्यापुढे टायर पेटवून निषेध करीत घोषणाबाजी केली.
जमाव पंगावण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार रात्री दीड वाजतादरम्यान पोलीस ठाण्यासमोर जमा झालेल्या नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु असताना जमाव ऐकत नव्हता. अखेर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. तर जमावातील काहींनी पोलीस ठान्यावर दगडफेक केली.
रात्रीच वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखलचिमूर शहरात झालेल्या घटनेची माहिती होताच व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू अतिरित पोलीस ताफ्यासह दाखल झाले. सध्या शहरात शांतता आहे.