मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल येथे विषारी दारूचे सेवनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाने केली आहे. राज्य शासनाने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाख रुपये आर्थिक मदत दिली नाही, तर महासंघातर्फे २७ फेब्रुवारीला आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे पांगरमल येथील विषारी दारूच्या घटनेत ७ व्यक्तींना जीव गमवावा लागला होता. जिल्ह्यांमध्ये अवैध दारूचे धंदे सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. त्यामुळे सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करून घटनेला जबाबदार असलेल्यांचे निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
चंद्रशेखर बावनकुळेंनी राजीनामा द्यावा!
By admin | Published: February 21, 2017 4:19 AM