मुंबई : पॉन्झी योजना घोटाळयातील आरोपी असलेल्या चंद्रशेखरची अखेर चार महिन्यानंतर रविवारी कारागृहात रवानगी करण्यात आली. जे.जे डॉक्टरांच्या तपासणीत तो फिट आढळल्याने त्याला कारागृहात धाडण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.बोगस गुंतवणूक योजना जाहीर करून त्यातून भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवत शेखर ने हजारो नागरीकांना गंडा घातला होता. या घोटाळ्याचा मास्टरमाईंड असलेल्या शेखरने तब्बल १० कोटी रुपयांपेक्षा अधिक पैशांची अफरातफर या घोटाळ्यात केली होती. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याला अटक झाल्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. मात्र कारागृहात राहण्याची तयारी नसल्याने आजारपणाचे सोंग रचत गेल्या ४ महिन्यांपासून राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहे.माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या वैद्यकिय कागदपत्रातील फेरफार प्रकरण समोर येताच चंद्रशेखरच्या आजारपणाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. जे.जे रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी पार पाडल्यानंतर त्याला पुन्हा आर्थर रोड कारागृहात आणण्यात अशी माहिती कारागृह पोलीस निरीक्षक बिपीन कुमार सिंह यांनी दिली. (प्रतिनिधी)
चार महिन्यांनी चंद्रशेखर कारागृहात रवाना
By admin | Published: April 25, 2016 5:15 AM