ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 27 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद आणि मराठी विज्ञान परिषद, जळगाव विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने ४ व ५ फेब्रुवारी असे दोन दिवस तिसरे विज्ञान साहित्य संमेलन जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक(डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उद््घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्याहस्ते होणार आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. विज्ञान कथा चर्चासत्र व कथाकथन
४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी १२ ते १ - संजय मिस्त्री (मुंबई) यांचे विज्ञान व्यंगचित्रे, दुपारी २ ते ४ - विज्ञान कथा चर्चासत्र होईल. अध्यक्षस्थानी प्रा.यशवंत देशपांडे (औरंगाबाद) हे राहणार असून यात डी.व्ही.कुलकर्णी (मुंबई), शरद पुराणिक (नाशिक), प्रसन्न करंदीकर (सिंधुदुर्ग) हे सहभागी होतील. दुपारी ४.३० ते ६.३० विज्ञान कथाकथन होईल. डी.व्ही कुलकर्णी, शरद पुराणिक, प्रा.यशवंत देशपांडे, प्रसन्न करंदीकर हे भाग घेतील. विज्ञान लेखन व कविता चर्चासत्र
५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत विज्ञान लेखन चर्चासत्र होईल. त्याच्या अध्यक्षस्थानी अ.पां. देशपांडे (मुंबई) हे राहणार असून यामध्ये प्रा.राजाभाऊ ढेपे (सोलापूर), प्रा.मोहन मद्वाण्णा (सांगली), डॉ.विवेक पाटकर (मुंबई) हे सहभागी होतील. दुपारी १२ ते १ - विज्ञान फिल्म्स, पोस्टर्स, दुपारी २ ते ४ विज्ञान कविता चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी प्रा.शिरीष गोपाळ देशपांडे (मुंबई) हे राहणार आहे. प्रा.मोना चिमोटे (अमरावती), प्रा.यशवंत देशपांडे (औरंगाबाद) हे सहभागी होतील. दुपारी ४.३० वाजता संमेलनाचा समारोप होणार असून अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषदेचे जळगाव विभाग अध्यक्ष भालचंद्र पाटील हे राहणार आहेत. समारोप प्रसंगी संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पां.देशपांडे, जळगाव विभाग कार्यवाह दीपक तांबोळी यांची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन भालचंद्र पाटील, दीपक तांबोळी यांनी केले आहे