शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मुंबई ढगाळ; कमाल तापमान ३३ अंशावर स्थिर, ‘फोनी’मुळे राज्यातील हवामानात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 5:48 AM

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते. आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते. आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारसह मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर कायम असून, राज्यातील उर्वरित ठिकाणांवरील कमाल तापमानात किंचित अंशी घट नोंदविण्यात येत आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित भागांत कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ६ मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ७-८ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ९ मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, तर ६ ते ९ मे दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट राहील, असे सांगण्यात आले.प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)अकोला ४१.५, अमरावती ४२.६, अमरावती ४२.६, औरंगाबाद ३८.६, बुलडाणा ३८.२, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४०.४, जळगाव ४१, जेऊर ३७, कोल्हापूर ३५.९, मालेगाव ४०, सांताक्रूझ ३३.५, नागपूर ४३.५, नांदेड ४१.५, नाशिक ३६, उस्मानाबाद ३८.७, परभणी ४२.१, पुणे ३६.७, सांगली ३७.७, सातारा ३७.२, सोलापूर ४०.१, ठाणे ४०.२, उदगीर ३९.६, वर्धा ४३, यवतमाळ ४१.५

टॅग्स :Temperatureतापमान