सुजल पाटील
सोलापूर : अयोध्या निकालानंतर सोशल मिडियावरून कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल अशी नोटीस पोलीसांनी काढल्यानंतर सोशल मिडिया वापरकर्ते अलर्ट झाले. व्हॉटपअपच्या माध्यमातून कोणतीही अफवा पसरू नये यासाठी ग्रुप अॅडमिन चांगलेच दक्ष झाल्याचं दिसून आलं. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वच व्हॉटपअप ग्रुप अॅडमिनने ग्रुपची सेटिंग बदलून 'ओन्ली अॅडमिन' मॅसेज अशी व्यवस्था करून घेतल्याच पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या निकालच खुल्या मनानं स्वागत करण्याचं आवाहनही नेटिझन्सने केल्याचं दिसलं.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. निकालानंतर कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीसांनी देशभरात मोठा बंदोबस्त लावला. शिवाय सोशल मिडियावरून कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा आदेशही काढल्यामुळे सोशल मिडिया वापरकर्ते अलर्ट झाले. सर्वच व्हाटपअप ग्रुप अॅडमिन, फेसबुक वापरकर्ते व सामाजिक संस्था, संघटना, विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पोलीसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या या आवाहनाला नेटिझन्सने सकारात्मक प्रतिसाद देत, निकालानंतर धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं.
धार्मिक स्थळाच्या या संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून निकाल देण्यात आला. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे़, त्याच्यावर सर्व भारतातील जनतेनी विश्वास ठेवावा शिवाय दिलेला निकाल पाळणे बंधनकारक आहे. निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाटसअप, फेसबुक अथवा अन्य सोशल मिडियावूरन करणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल़ अशा वादग्रस्त पोस्ट करणाºयायाविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे.
पोलिसांच्या या संदेशाला नेटिझन्सने सकारात्मकता दर्शवल्याचं आज पाहायला मिळालं. हिंदू-मुस्लिम भाई भाई... ईश्वर-अल्ला एक है... संविधानाचा आदर... न्यायालयाच्या निकालाचे स्वागत... असे सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले. त्यामुळे साहजिकच या निकालाच सर्वच स्तरातून वेलकम करण्यात आलं.