शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

जिल्ह्याच्या दळणवळणात आमूलाग्र बदल शक्य

By admin | Published: June 06, 2017 2:37 AM

विकासकामांमुळे रायगड जिल्ह्याच्या दळणवळणात येत्या काळात आमूलाग्र बदल घडून येणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सावित्री नदी पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या विविध विकासकामांमुळे रायगड जिल्ह्याच्या दळणवळणात येत्या काळात आमूलाग्र बदल घडून येणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.रायगड जिल्हा पॅकेजअंतर्गत, २४७.१३ कोटी रुपये खर्चाचा महाड जंक्शन (रा.म.६६ वरील कि.मी.१२३/४००), ते रायगड किल्ला (जिजामाता समाधीपर्यंत व चित्त दरवाजा व हिरकणीवाडीपर्यंत)चा दुपदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रीट रस्ता. रस्त्याची एकूण लांबी २५.६०९ कि.मी. ठळक वैशिष्ट्ये :- काँक्रीट रस्ता २ लेन पेव्हड शोल्डरसह, एक मोठा पूल, १९ लहान पूल, १४० मोऱ्या. ४२१.०२ कोटी रुपये खर्चून आंबडवे-पाचळ-मंडणगड-राजेवाडी (रा.म.क्र. ६६ जंक्शन)चे दोन पदरी व पेव्हड शोल्डरसह काँक्रीट रस्ता बांधणी. रस्त्याची एकूण लांबी ५९.६६७ कि.मी. ठळक वैशिष्ट्ये - काँक्रीट रस्ता २ लेन पेव्हड शोल्डरसह, एक मोठा पूल, १७ लहान पूल, ३२४ मोऱ्या आणि रेल्वे खालील एक पूल. वरील रस्ते विकासामुळे दळणवळण सुकर होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा रस्ता चौपदरीकरण (तीन पॅकेजेस)इंदापूर (कि.मी. ८४/००) ते वडपाले (कि.मी. १०८/४००) या टप्प्याच्या चौपदरीकरणाकरिता चेतक एटंरप्रायजेस, जयपूर या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, याकामी १२०२.५२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याची एकूण लांबी २६.७५ कि.मी. आहे. ठळक वैशिष्ट्ये -फोरलेन काँक्र ीट रस्ता पेव्हड शोल्डरसह, इंदापूर व माणगाव शहरास बायपास, एक उड्डाणपूल, रेल्वेवरील तीन पूल, एक मोठा पूल, ९ लहान पूल, ८ बसथांबे, एक ट्रक थांबा यांचा समावेश आहे.वीर (कि.मी. १०८/४००) ते भोगाव (खुर्द), (कि.मी. १४८/००) या रस्त्याच्या चौपदरीकरणाकरिता एल अ‍ॅण्ड टी कंपनी, मुंबई या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून, याकामी १५९८.४७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याची एकूण लांबी ३८.७६ कि.मी. आहे. ठळक वैशिष्ट्ये - काँक्र ीट रस्ता फोर लेन पेव्हड शोल्डरसह, एक उड्डाणपूल, दोन मोठे पूल, नऊ लहान पूल, वाहनांसाठी १८ ओव्हर/अंडर पास रोड, तीन पादचारी पूल यांचा समावेश राहणार आहे.भोगाव (खुर्द), (कि.मी. १४८/००) ते कशेडी घाट (कि.मी. १६१/६००)दरम्यान १.७२ कि.मी.चे दोन बोगदे व ९ कि.मी. जोडरस्ता, यांचा समावेश असून याकामी १०११.८९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. रस्त्याची एकूण लांबी ९ कि.मी. दोन बोगद्यांची प्रत्येकी लांबी १.७२० कि.मी., पोचमार्गाची लांबी ७.२८ कि.मी. दरीवरील पुलाची लांबी ६८० मी., नदीवरील पुलाची लांबी ४६६ मी. राहणार आहे.केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मंजूर विकासकामेअलिबाग-रेवदंडा रस्ता (प्रा.रा.मा. ४ कि.मी. 00/00 ते १४/१००)चे १० कोटी खर्चून काँक्रि टीकरण करणे, शिरवली माणकुले रस्त्याची १० कोटी खर्चून सुधारणा करणे, सुधागड तालुक्यातील वाकण-पाली-खोपोली (रा.मा. ९३), रस्त्याची ४.५ कोटी रुपये खर्चून सुधारणा करणे, सुधागड तालुक्यातील उद्धर-कुंभरघर-महागाव-हातोंड-गोंदाव (रा.मा.९३ प्र.जी ता.४०), रस्त्याची ४ कोटी रुपये खर्चून सुधारणा करणे. दिघी-नानावटी-साव-आडगाव-वेळास रस्त्याचे ६ कोटी ५० लाख रुपये खर्चून रुंदीकरण व सुधारणा करणे, या कामांचा समावेश आहे.