लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे एनडीए व लोहगाव येथील संरक्षण विभागाच्या विमानोड्डाणांना अडथळा येत नाही ना, याबाबत पुन्हा तांत्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामुळे सध्या प्रस्तावित करण्यात आलेल्या जागेत पुन्हा काही बदल होण्याची शक्यता असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.पुण्यासाठीचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सुमारे दोन हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातील वाघापूर, राजेवाडी, आमडे या गावांच्या परिसरातील जाग निश्चित केली होती. परंतु, येथील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्यानंतर ही जागा कुंभारवळण, खानवडी, पारगाव, मेमन, वनापुरी या परिसरात हलविण्यात आले. या जागेचा अत्यंत सूक्ष्म सर्वेक्षण करून अंतिम अहवाल शासनाला व एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि राज्य विमानतळ विकास प्राधिकरणाला सादर करण्यात आला. या सर्वांनी या जागेला मान्यतादेखील दिली. याबाबत पुन्हा तीन आठवड्यांत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी राव यांना विचारले असता सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून, एअर पोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडिया जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हा अहवाल सादर करणार आहे. परंतु, यामुळे पुरंदर विमानतळाच्या जागेत पुन्हा काही बदल होण्याची शक्यता राव यांनी व्यक्त केली.>‘एअर स्पेस’ला अडचण अद्याप पुरंदर येथील जागेला संरक्षण विभागाची मान्यता मिळालेली नाही. यासाठी ४ जुलै रोजी दिल्लीत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुणे शहर आणि परिसरामध्ये संरक्षण विभागाची अनेक महत्त्वाचे केंद्रे आहेत. तसेच लोहगाव व एनडीएच्या धावपट्टीवरून नियमित संरक्षण दलाच्या विमानाचा सराव होत असतो. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या ‘एअर स्पेस’ला अडचण निर्माण होऊ शकते का व इतर काही तांत्रिक अडचणी संरक्षण विभागाने उपस्थित केल्या आहेत.
पुरंदर विमानतळ जागेत बदल
By admin | Published: July 12, 2017 1:09 AM