शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

पश्चिम रेल्वेच्या तिकीट दर रचनेत व टप्प्यात बदल ?

By admin | Published: October 31, 2016 5:39 AM

अल्प दरात मुंबई उपनगरीय प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या रेल्वेचे भाडे वाढण्याची शक्यता आहे.

सुशांत मोरे,

मुंबई- अल्प दरात मुंबई उपनगरीय प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या रेल्वेचे भाडे वाढण्याची शक्यता आहे. तिकीट दर रचनेत व टप्प्यात बदल करण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. स्थानकांच्या टप्प्यात बदल करतानाच ते वाढवण्यात येणार असून त्याचा परिणाम तिकीटांच्या दरांवर होईल. पश्चिम रेल्वेचा हा प्रस्ताव मंजुर झाल्यास मध्य रेल्वेलाही आपल्या तिकीट दर रचनेत बदल करावे लागतील.

रेल्वे प्रशासनाकडून लोकलमधून प्रवाशांची अवघ्या १४ ते १६ पैसे प्रति किलोमीटर एवढया अल्प दराने वाहतूक केली जाते. ही वाहतूक करतानाच मध्य व पश्चिम रेल्वेला ६0 टक्के उत्पन्न आणि ४0 टक्के नुकसान सोसावे लागते. नुकसान कमी करतानाच उत्पन्न कसे वाढेल यावर सध्या रेल्वे प्रशासनाकडून लक्ष केंद्रीत केले जात आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे प्रशासनाने उपनगरीय रेल्वेच्या तिकीट दरांत वाढही केलेली नाही. त्यामुळे प्रवासी उत्पन्नावरही त्याचा परिणाम झालेला आहे. एकूणच परिस्थीती पाहता पश्चिम रेल्वेने दर रचनेत व टप्प्यात बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

आणखी वाचा 
छगन भुजबळांच्या ठोक्यांची तपासणी सुरू
गिरगावमधील मेहता मॅन्शन इमारतीला भीषण आग
वीजचोरी करणाऱ्यांवर बेस्ट, पोलिसांचे छापे

 

प्रस्तावानुसार तिकीटांचे चार टप्पे असून ५, १0, १५ आणि २0 रुपये असे दर आकारले जातात. या टप्प्यात बदल करण्याचे सूचित करण्यात आले आहेत. प्रथम श्रेणी आणि व्दितीय श्रेणीच्या तिकीट तसेच पासांतील शुल्कात मोठा फरक असून तो कमी करण्यासाठी दुसऱ्या श्रेणीच्या शुल्कात वाढ करण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे या श्रेणीचे प्रवासी प्रथम श्रेणीच्या प्रवासाकडे वळतील आणि उत्पन्नही वाढेल.

चर्चगेटपासून दादर, मालाड या स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी दहा रुपये तिकीट आकारण्यात येते. त्यामुळे चर्चगेटपासून दादर आणि मालाडपर्यंत जाण्यासाठी तेवढ्याच तिकीट दरात प्रवाशांचा प्रवास होतो. प्रस्तावानुसार या टप्प्याला कात्री लावून चर्चगेट ते दादरपर्यंतच्या प्रवासासाठी किंवा अंधेरीपर्यंत दहा रुपयेच प्रवाशांना मोजावे लागतील. तर त्यानंतर मालाडपर्यंतच्या प्रवासासाठी हे अधिक मोजावे लागणार आहेत. एकूण प्रवास टप्प्यांना कात्री लावतानाच तिकीट दर आपोआप वाढेल. >सध्याचे टप्पे व दरपश्चिम रेल्वेटप्पेतिकीट दरचर्चगेट ते मालाड१0 रुपयेचर्चगेट ते वसई रोड१५ रुपयेमध्य रेल्वे टप्पेतिकीट दरसीएसटी ते भांडुप१0 रुपयेसीएसटी ते कल्याण१५ रुपये