पिंपरी : श्रीक्षेत्र देहूतून संत तुकोबांचा पालखीसोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यामुळे पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. इनामदारवाडा देहूतून पालखी आकुर्डीत मुक्कामी येणार आहे. त्यामुळे देहू फाटा ते भक्तीशक्ती मार्गावर सकाळी ६ पासून जड वाहनांना बंदी आहे. पुण्याकडे येण्याकरिता देहूफाटा ते कात्रज बाह्यवळण मार्ग, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांकरिता खंडोबाचा माळ, उजवीकडे वळून थरमॅक्स चौक ते देहूरोड अशी पर्यायी व्यवस्था आहे. भक्तीशक्ती चौक ते देहू फाटा मार्ग बंद ठेवला आहे. त्यामुळे पुण्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी देहू फाटा ते कात्रज बाह्यवळणमार्गे काळा खडक,डांगे चौक मार्गे वाकड,चिंचवडमार्गे इच्छित स्थळी जाता येईल. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांकरिता खंडोबा माळ उजवीकडे वळून थरमॅक्स चौक ते देहूरोड असा मार्ग राहील. प्राधिकरणाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी थरमॅक्स चौक, खंडोबा माळ, चापेकर चौक,चिंचवडे फार्म,बिजलीनगरमार्गे प्राधिकरण, टेल्को रस्ता, थरमॅक्स चौक-दुर्गादेवी चौक, चिकन चौक, भक्ती शक्ती चौक मार्गे अंतर्गत रस्त्यांचा वापर करता येईल. दुर्गादेवी चौक ते टिळक चौक मार्ग बंद ठेवल्याने चिकन चौक किंवा थरमॅक्स चौक मार्गे खंडोबामाळ रस्त्याचा वापर करावा. म्हाळसाकांत चौक ते टिळक चौक मार्ग बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे म्हाळसाकांत चौक-खंडोबामाळ -संभाजी चौक-बिजलीनगर-चिंचवडे फार्म- रावेत असा पर्यायी मार्ग राहील. जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील निगडी जकात नाका ते खंडोबा माळ दरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन बाजू बंद ठेवण्यात येणार आहेत. पुण्याकडे येणारा सर्व्हिस रस्ता दुपारी २ ते ६ दरम्यान बंद ठेवला जाणार आहे. खंडोबा माळकडून प्राधिकरणाकडे जाणाऱ्या वाहनांनी एसकेएफ कंपनी रस्त्याने चापेकर चौक, बिजलीनगर येथून प्राधिकरणाकडे जावे. प्राधिकरणातून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी बिजलीनगर, चापेकर चौक मार्गे महावीर चौकातून पुणे -मुंबई मार्गावर जावे. (वार्ताहर)बुधवारपासून पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल केला जाणार आहे. त्यात थरमॅक्स चौक ते खंडोबा माळ रस्ता बंद ठेवला जाणार आहे. त्या वेळी केएसबी चौक-दुर्गादेवी चौक, टेल्को रस्त्याचा वापर करावा, भक्तीशक्ती चौक, टिळक चौक बंद असेल त्या वेळी ग्रेड सेपरेटरमार्गे पुण्याकडे जावे. अहिंसा चौक, महावीर चौक बंद असेल तेव्हा एसकेएफ लिंक रस्त्याचा वापर करावा. अहिंसा चौक - महावीर चौक बंद असेल त्या वेळी एसकेएफ लिंक रस्त्याचा वापर करावा. मोहननगर कमान ते पोस्ट कार्यालय मार्ग बंद असेल तेव्हा अंतर्गत रस्त्याचा वापर करावा. अजमेरा कॉर्नर ते अहिल्यादेवी चौक मार्ग बंद असेल तेव्हा अजमेरा कॉलनी ते केएसबी चौक टेल्को रस्ता, अजमेरा कॉलनी ते यशवंतनगर चौक आणि चिंचवडगाव मार्गे चापेकर चौक, पिंपरी पुलमार्गे लिंक रस्ता- चापेकर चौक असा पर्यायी मार्ग राहील. पालखी अहिल्यादेवी चौकात आल्यानंतर पिंपरी पूल मोरवाडीकडे येण्याचा मार्ग बंद राहील.
पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल
By admin | Published: June 28, 2016 1:42 AM