मुंबई : वाहतूक कोंडी तसेच वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, कॉ. कृष्णा देसाई चौक, (भारतमाता जंक्शन) व शिंगटे मास्तर जंक्शन, ना.म. जोशी मार्गावरील वाहतूकीवर १९ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात निर्बंध घालण्यात आले आहेत. शिंगटे मास्तर चौकाकडून महादेव पालव मार्गावरून (करीरोड उड्डाणपुलावरुन) कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे, (भारतमाता जंक्शन) येथे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतूकीस (बेस्ट बसेस सह) (रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) १९ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत बंदी घातली आहे. ना. म. जोशी मार्गावरुन, शिंगटे मास्तर चौकाकडून महादेव पालव मार्गावरुन (करीरोड उड्डाणपुलावरुन) कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे, (भारतमाता जंक्शन) येथे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस या कालावधीत स. ८ ते रात्री ९ पर्यंत ‘उजवे वळण व डावे वळण’ बंद करण्यात आलेले आहे.डॉ. बी.ए. रोड, कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) येथून महादेव पालव मार्गावरुन (करीरोड उड्डाणपुलावरुन) शिंगटे मास्तर चौकाकडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी एकेरी करण्यात आली आहे. ना. म. जोशी मार्गावरुन, शिंगटे मास्तर चौकाकडून महादेव पालव मार्गावरुन (करीरोड उड्डाणपुलावरुन) कॉम्रेड कृष्णा देसाई चौकाकडे (भारतमाता जंक्शन) येथून जिजीभॉय लेनकडे जाणार्र्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. तसेच डॉ. बी. ए. रोडवर जाण्यास उजवे वळण सकाळी ८ ते रात्री ९ दरम्यान बंद करण्यात आलेले आहे.या निर्बंधानंतर पर्यायी मार्ग म्हणून शिंगटे मास्तर चौकाकडून महादेव पालव मार्गावरून, (करीरोड उड्डाणपुलावरुन) कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) येथे येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही शिंगटे मास्तर चौकाकडून सरळ पुढे ना. म. जोशी मार्ग-कॉ. गणाचार्य चौक (चिंचपोकळी नाका)-डावे वळण-चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपुल-गॅस कंपनी जंक्शन-डावे वळण-डॉ. बी.ए. रोड-कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) येथून पुढे जाईल, असे वाहतूक पोलीस उपायुक्तांकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक मार्गात बदल
By admin | Published: September 20, 2016 2:31 AM