शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

समृद्धी महामार्गाला विरोध करणा-यांना चॅप्टर नोटीस

By admin | Published: March 20, 2017 3:37 PM

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध करणा-या जमीन मालकांना चॅप्टर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 -  नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध करणा-या जमीन मालकांना चॅप्टर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कल्याण, भिवंडी आणि शहापूर प्रशासनानं या नोटीसा बजावल्या असून नोटीसांद्वारे सर्व जमीन मालकांना बोलवणं धाडण्यात आलं आहे. जमीन मालकांशी चर्चा करुन उपाय काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत असून जमीन मालकांशी समोरासमोर चर्चा करुन महामार्गाचे फायदे सजमावून सांगण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे.  मात्र जमीन मालकांनी या नोटीसांना धुडकावत केराची टोपी दाखवली आहे. प्रशासन चॅप्टर नोटीसआड आपल्यावर दडपशाही करत असल्याचा आरोप जमीन मालकांनी केला आहे. चर्चेला गेल्यास आपल्याकडून बॉन्ड लिहून घेतले जाण्याचा संशयही जमीन मालकांना वाटतोय. 
 
समृद्धी महामार्गात कल्याण, भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. त्यापैकी कल्याण तालुक्यातील उशीद, फळेगाव, रुंदे, उतणे, गुरवली, निंबवली, राया, दानबाव, चिंचवली येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जागा महामार्ग व स्मार्ट सिटीत बाधित होत आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांनी वारंवार बैठका, सभा घेऊनही सरकारी अधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी सीमांकन, मोजणी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या नाहीत, तर प्रशासन का जबरदस्ती करून ही कामे करत आहे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला होता.
 
७०२ किमी लांबीचा हा महामार्ग १० जिल्हे, २४ तालुके व ३८५ गावांना जोडणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर प्रवासाचा कालावधी १६ तासांवरून घटून अवघ्या ८ तासांवर येईल.