शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भाजयुमो अध्यक्षावर अश्लील वर्तनाचा आरोप, पक्षातून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2016 8:10 PM

मुंबई भाजपाच्या युवा शाखेचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी मथुरा येथील दौर्‍यावेळी आपल्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप भाजयुमोच्या महिला पदाधिकार्‍याने केला असून गणेश यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

मुंबई, दि. २६ - मुंबई भाजपाच्या युवा शाखेचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी मथुरा येथील दौर्‍यावेळी आपल्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप भाजयुमोच्या महिला पदाधिकार्‍याने केला आहे. हा आरोप तसेच अंतर्गत गटबाजीच्या पार्श्‍वभूमीवर भाजयुमोची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच पांडे यांच्याकडून पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी चालू असताना भाजयुमोतील हा अश्लील वर्तनाच्या आरोपामुळे मुंबई भाजपात खळबळ उडाली आहे. मथुरा येथे ४,५ आणि ६ मार्च दरम्यान भाजयुमोच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. याला मुंबईतील पदाधिकार्‍यांनीही हजेरी लावली होती. या दौ-यात अध्यक्ष गणेश पांडे यांनी एका महिला उपाध्यक्षाशी अत्यंत असभ्य वर्तन करत अश्लील शेरेबाजी केली.त्याची लेखी तक्रारच पीडित महिलेनेच केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि सहसंघटन मंत्री सुनिल कर्जतकर यांनी पांडे आणि तक्रारदार महिला पदाधिकार्‍यास बाजू मांडण्यास सांगितले. त्यातच पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप उपाध्याय आणि त्यांच्या सहका-यावर जीवघेणा हल्ला झाला. (प्रतिनिधी)

दरम्यान गटबाजीमुळे उपाध्याय यांच्यावर हल्ला झाला असून त्यामागे गणेश पांडे गटाचा हात असल्याची जोरदार चर्चा पक्षात सुरु होती. या पार्श्वभूमीवर सुमारे ७० जणांची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्तीचा निर्णय पक्षाने घेतला आहे.