- डिप्पी वांकाणी , मुंबईनवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी ‘हेक्स वर्ल्ड प्रोजेक्ट’ प्रकरणी समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि इतर तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र ७,९०० पानी असून त्यात २७४ साक्षीदारांचे जबाब आहेत. २,३४४ जणांची ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा समीर व पंकज यांच्यावर आरोप आहे. खारघर येथे निवासी प्रकल्प सुरू करीत असल्याचे भासवून त्यापोटी अॅडव्हान्स म्हणून ही रक्कम घेण्यात आली होती. मात्र, हा प्रकल्प कधीही सुरू झाला नाही. दिवीशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीद्वारे खारघर निवासी प्रकल्प साकारण्यात येणार होता. भुजबळ बंधूंनी ही कंपनी स्थापन केली तर राजेश धारप, सत्येन केसरकर आणि अमित श्रीवास्तव हे या कंपनीचे संचालक होते. त्यांच्यावर गुन्हेगारी कट, विश्वासघात, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
हेक्स वर्ल्ड घोटाळा प्रकरणी समीर, पंकज भुजबळांवर आरोपपत्र
By admin | Published: February 26, 2016 2:02 AM