शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

चारमोळीने पाषाण फोडले अन् माझे हृदय हेलावले!

By admin | Published: May 10, 2017 2:01 AM

पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या पातूर तालुक्यातील चारमोळी गावाने काळा पाषाण फोडून जलसंधारणाची

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या पातूर तालुक्यातील चारमोळी गावाने काळा पाषाण फोडून जलसंधारणाची कामे केली आहेत. त्यांच्या कामाची माहिती मिळताच माझे हृदय हेलावले आणि मी या गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला, असे भावुक प्रतिपादन अभिनेता आमीर खान यांनी मंगळवारी केले. चारमोळी येथे जलसंधारणाच्या कामांची पाहणी व ग्रामस्थांशी हितगुज साधण्यासाठी आमीर खान व त्यांच्या पत्नी किरण राव आले होते. ग्रामसभेत ते म्हणाले की, चारमोळी गावाने वॉटर कप स्पर्धेसाठी दुप्पट श्रमदान केले. आदिवासीबहुल असलेल्या गावात एक वेळ श्रमदान व दुपारी मजुरी करून ग्रामस्थ जलसंधारणाची कामे करीत आहेत. त्यामुळे या गावाचा राज्यातील इतर गावे आदर्श घेतील. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे गेल्या वर्षापासून सुरू झाली आहेत आणि ती कामे सुरूच राहणार आहेत. त्यामुळेच आपले राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल, असा विश्वासही आमीर खान यांनी व्यक्त केला. पाणीटंचाईवर ग्रामस्थांनी एकत्र येऊन उपाय शोधला आहे. ही सुरुवात आहे. या श्रमदानाच्या कामांमधून लोकांमध्ये एकी निर्माण होत आहे. त्यामुळे इतर कुठल्याही समस्येवर ग्रामस्थ स्वत:च उपाय शोधू शकतात. आमीर खान यांनी चारमोळी गावात श्रमदानातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच श्रमदान करणाऱ्यांबरोबर हितगुज केले. त्यांच्याकडून श्रमदानाविषयी माहिती घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अकोला जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील गावांमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती त्या-त्या तालुका समन्वयकांकडून त्यांनी जाणून घेतली. शेवटी ग्रामसभेत ग्रामस्थांच्या भजनात आमीर खान व किरण राव तल्लीन झाले होते. गावाला वॉटर कप जिंकण्याच्या शुभेच्छा देऊन त्यांनी ग्रामस्थांचा निरोप घेतला.