शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

सकारात्मक विरोधकाची भूमिका बजावू - चव्हाण

By admin | Published: March 03, 2015 2:31 AM

पक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे.

मुंबई : पक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे. केवळ विरोधाला विरोध ही काँग्रेसची भूमिका नाही तर सरकारवर अंकुश लावण्याचे काम करणार असल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदाच्या घोषणेनंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी, केंद्र आणि राज्य शासनाचा कारभार, शेतकरी आत्महत्या, स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव, आघाडीचे राजकारण आणि आदर्श प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निकालांनी आव्हानात्मक परिस्थिती स्पष्ट केली आहे. ज्या जिल्ह्यात पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे तिथे अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. लवकरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून जिल्हावार दौरे करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आपली भूमिका असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. सरकारमध्ये राहून शिवसेना वेगळी भूमिका कशी घेते? भूसंपादनाला त्यांचा खरोखरच विरोध असे तर त्यांनी सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडावे, असा टोलाही चव्हाण यांनी हाणला. शेतकरी आत्महत्या आणि स्वाइन फ्लू रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत. माझ्या कार्यकाळातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या. तसे आता दिसत नसल्याचे चव्हाण म्हणाले. फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात विचारांची लढाई लढावी लागेल. हा केवळ पोलीस बंदोबस्ताचा विषय नाही. सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन काम करू. राष्ट्रवादीसोबत आपले ट्युनिंग चांगले आहे. पण जिथे पटणार नाही तिथे विरोध करणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.एमआयएमला ‘व्यवस्थित’ हाताळू एमआयएमप्रमाणे मुस्लीम लीगचाही उदय नांदेडमध्येच झाला. भावना भडकावण्याचे राजकारण फार काळ टिकणार नाही. एमआयएमचा प्रभाव जसा वाढला तसाच तो लवकरच नष्टही होईल. पण आगामी निवडणुकीत एमआयएमला ‘व्यवस्थित’ हाताळू, असे चव्हाण म्हणाले.