चांदूरबाजार (जि़ अमरावती) : भाजपाला सहकार्य करणा:या रामदास आठवले व महादेव जानकर यांना ‘चवन्नी छाप’ नेते म्हणून काही लोक उल्लेख करतात, अशांना भविष्यात राज्यातील मतदारच ‘चवन्नी छाप’ कोण? हे दाखवून देतील, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.
भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
अवघ्या 2क् मिनिटांच्या भाषणात फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारांचा
प्रश्न, सिंचन घोटाळा, शिक्षण, उद्योगधंदे आदींवर भाष्य केले. ते म्हणाले, गत 15 वर्षापासून सत्ता भोगणा:यांनी महाराष्ट्राचे पार वाटोळे केले.
आधी याचा हिशेब नाकत्र्या काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने जनतेला द्यावा. उगाच उणोपुरे 1क्क् दिवस झालेल्या मोदी सरकारला हिशेब मागण्याच्या फंदात पडू नय़े राज्यातील नुकसानग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतक:यांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजचा लाभ सत्ताधा:यांनीच मोठय़ा प्रमाणात घेतल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुशासनाची संकल्पना रु जवण्यासाठी आणि त्यांच्या विचारांची शेती पिकविण्यासाठी राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे तण या निवडणुकीत काढून टाका, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बुलडाण्यात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत केले. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण भाजपाच्या नेत्यांसह लढत होतो़ पण त्यावेळी इतर पक्षांचे नेते गप्प बसले होते. त्यांना कोठे तरी कमिशन मिळत असल्याने ते तोंड उघडत नव्हते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला़