शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

जहाजावर नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By admin | Published: August 24, 2016 5:05 AM

पाच ते सहा तरुणांची १९ ते २० लाखांची फसवणूक करणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अटक केली

ठाणे : आखाती कंपनीच्या तेलवाहू जहाजावर नोकरी देण्याचे अमिष दाखवून पाच ते सहा तरुणांची १९ ते २० लाखांची फसवणूक करणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख १४ हजार ९०० रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.शशिभूषण सिंग, धीरजकुमार उर्फ मनोज संजयकुमार सिंग आणि अभिलाष कोरडे अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. नाशिकच्या भूषण जाधवने नवी मुंबईतील नेरुळ येथील एका संस्थेतून ‘डिप्लोमा इन नॉटीकल सायन्स’चे शिक्षण घेतल्यामुळे तो जहाजावरील अधिकारी पदाच्या नोकरीच्या शोधात होता. आखाती देशात नोकरीला लावणाऱ्या धीरजकुमार या एजंटच्या तो संपर्कात आल्यानंतर त्याने कोपरीतील ‘मातोश्री शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लि.’ या कंपनीचे संचालक शशिभूषण आणि सूर्यप्रकाश तिवारी यांची सर्व कागदपत्रांसह भेट घेण्यास सांगितले. या दोघांनीही त्याला दुबईतील तेलवाहू जहाजावर दरमहा ६०० अमेरिकन डॉलर (३९ हजार रुपये) वेतनाची नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी प्रवासखर्च स्वत: करावा लागेल. त्याव्यतिरिक्त साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. मुलाला चांगली नोकरी लागेल, या आशेपोटी भूषणच्या वडिलांनी त्यांची गावाकडील जमीन विकून तसेच उसनवारीने पैशांची उभारणी करून त्याला आखाती देशात नोकरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. धीरजकुमारच्या सांगण्यावरून भूषणने बंगळुरू येथील अरविंद गुप्ता याच्या बँक खात्यात ७ जुलै २०१५ रोजी दोन लाख रुपये जमा केले. त्याबदल्यात धीरजकुमारने अभिलाष कोरडे या आणखी एका एजंटच्या मदतीने त्याला नोकरीचे करारपत्र, इराणचा व्हिसा ही कागदपत्रे पाठवून, ८० हजार रुपये अमेरिकन डॉलरमध्ये रुपांतरीत करुन इराणच्या एजंटला देण्यास सांगितले. जहाज इराणला उभे असल्याचे सांगून दुबईऐवजी इराणला जावे लागेल, असेही सांगितले. इराणच्या बुशेर विमानतळाचे हवाई तिकीट स्वखर्चाने खरेदी केल्यानंतर भूषणने ८ जुलै रोजी इराणला जाऊन लिआॅन ओशन स्टार कंपनीचा एजंट विकास आणि राजू यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीनुसार १२०० यूएस डॉलरही त्यांना दिले. त्यांनीही दुबईच्या तेलवाहू जहाजावरील नोकरीऐवजी त्यांना इराण बुशेर येथील एका खोलीत भारतातून नोकरीसाठी आलेल्या २५ जणांसह डांबून ठेवले. एक महिना निकृष्ट जेवण देऊन त्यांचा छळ केल्यानंतर मासेमारी बोटीवर नोकरीला लावले. त्याठिकाणी सहा महिने काम करूनही त्यांना अवघ्या चार महिन्यांचा २०० डॉलर (केवळ १३ हजार रुपये) पगार दिला. त्याठिकाणी काम करताना इराणी क्रू मेंबर्सनी शिवीगाळ करणे, धमकी देणे, उपाशी ठेवणे असा छळही केला. या छळाला कंटाळून ते फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतात पळून आले. (प्रतिनिधी)>ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी दखल घेतल्याने लागला छडाया प्रकरणातून कसेबसे सावरल्यानंतर त्याने आपबिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना कथन केली. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त नागेरश लोहार आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक आर. आर. दौंडकर यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. कोपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंततर मातोश्री शिप मॅनेजमेंटचा संचालक शशीभूषण रा. उल्हासनगर याला ३१ जुलैला अटक केली. त्यापाठोपाठ दोन लाखांची रोकड घेऊन पसार झालेला धीरजकुमार यालाही बिहारमधून ८ आॅगस्ट रोजी अटक केली. तर ठिकाण बदलणाऱ्या अभिलाष कोरडे याला पुण्याच्या शिवाजीनगर भागातून १६ आॅगस्ट रोजी अटक केली. शशिभूषण आणि धीरजकुमार यांना न्यायालयीन तर अभिलाषला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी अशाच प्रकारे आणखी पाच ते सहा जणांकडून प्रत्येकी साडेतीन लाखांची रोकड उकळल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. ही मुले परतल्यानंतर त्यातील तथ्य तपासण्यात येणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.