अहमदनगर : शुल्क घेतल्यानंतरही सहली रद्द करून, पर्यटकांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या एका सहल कंपनीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आनंद टुर्स प्रा. लि. (मार्केट यार्ड) कंपनीच्या नगर येथील व्यवस्थापक सरिता शेषराव साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी मुंबई येथील ‘मेक वे हॉलिडे’ कंपनीचे संचालक झेनी विजयभानसिंग उर्फ सोनाली डिसिल्व्हा वसदर आणि विजयभानसिंग रामेश्वर सिंग (पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मार्च ते मे या कालावधीत हॉलिडे कंपनीने आयसीआयसीआय बँक, तसेच आनंद टुर्स प्रा. लि. यांच्याकडून पर्यटकांचे ४८ लाख १० हजार रुपये जमा करून घेतले. त्यानंतर नियोजित तारखांच्या सहली विनाकारण रद्द केल्या. पैसे घेतल्यानंतर बनावट पीएनआर नंबर पाठवून तिकीट आरक्षित केल्याचे भासविले.हा प्रकार ध्यानी आल्यावर संबंधितांना ही रक्कम परत केली नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ड्रीम हॉलिडेकडूनही फसवणूककाही पर्यटकांनी थेट ड्रीम हॉलिडे या कंपनीतही सहलीसाठी रक्कम भरली होती. मात्र, त्यांच्या सहली अचानक रद्द करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पर्यटकांनीच दाखल केलेल्या फिर्यादीवरून चार-पाच महिन्यांपूर्वी ड्रीम हॉलिडे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.हॉलिडे कंपनीचे मालक मुंबईस्थित आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत. आरोपी अटक झाल्यानंतरच सत्य काय आहे ते बाहेर येईल. -सोमनाथ मालकर, पोलीस निरीक्षक
मुंबईच्या सहल कंपनीकडून फसवणूक
By admin | Published: December 16, 2015 1:48 AM