ठाणे : हरियाणातील गुरूग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्याचार करून मुलाचा खून झाल्यानंतर भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी मनसेने शाळेतील कर्मचा-यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याची मागणी केली होती. ती पोलिसांनी मान्य केली आहे.मनसेचे शहराध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन ठाणे शहरातील शाळांतील कर्मचाºयांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी दरवर्षी पोलिसांमार्फत व्हावी, अशी मागणी केली होती. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्काळ या मागणीला होकार देऊन परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत सर्व पोलीस ठाण्यांना तातडीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता दरवर्षी शाळेतील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे. एखादा कर्मचारी वेगळ््या शहरात नोकरीला असेल आणि त्याने राहतो त्या भागात काही गुन्हेगारी कृत्य केले असेल तर त्याची माहिती यामुळे पोलिसांना समजू शकेल.>वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळांना त्यांच्या कर्मचारीवर्गाच्या (स्कूल बसचालक, सहायक, सफाई कामगार, शिपाई आदींची) गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी दरवर्षी करावी, अशी लेखी सूचना परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्तांनी केली आहे.