जितेंद्र कालेकरठाणे : 'चेकमेट सव्र्हिसेस' या खासगी वित्त कंपनीत काही दिवसांपूर्वी एका कर्मचा:याकडून 25 हजारांची रोकड असलेली बॅग गहाळ झाली होती. ही बॅग गहाळ करणारा कंपनीचा माजी कर्मचारी आकाश चव्हाण याने कंपनीच्या अधिका:यांकडे पैसे भरण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र, ती न देता त्याच्या मैत्रिणीसमोरच त्याला फैलावर घेतले होते. याच अपमानाचा बदला घेण्याच्या ईष्रेतून चेकमेटवर दरोडा टाकण्याचा कट त्याने आखल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
फेब्रुवारी 2016 मध्ये आकाश चव्हाणने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापक शरद शेट्टी यांच्याकडे रात्रपाळीची मागणी केली होती. नंतर, त्यानेच आपल्याला रात्रपाळी नको, दिवसपाळी हवी, अन्यथा कामाला यायला जमणार नाही, असे सांगून नोकरी सोडली होती. कालांतराने मे 2016 मध्ये कंपनीतील आणखी एक कर्मचारी संतोष आणि त्याच्या आणखी एका साथीदाराकडून 25 हजारांची रोकड असलेली बॅग गहाळ झाली होती. बॅग नेमकी कुठे गहाळ झाली, याचे काहीच उत्तर त्यांच्याकडे नव्हते. त्या वेळी या दोघांना पैसे भरण्याकरिता काही दिवसांची मुदत देण्याची मागणी करण्यासाठी आकाश त्याच्या मैत्रिणीबरोबर तेथे आला होता.
परंतु, हा पैशांचा मामला असल्यामुळे रोकड आजच भरली गेली पाहिजे. फारतर, आज रात्री 11 र्पयतच या दोघांना मुदत मिळेल, असे शेट्टी यांनी आकाशसह तिघांनाही सुनावले होते. ज्याच्याकडून पैसे गहाळ झाले, तो आपल्या शेजारीच राहणारा असल्याची बतावणी आकाशने केली होती. अर्थात, संतोष आणि त्याच्या साथीदाराने काही नातेवाइकांच्या मदतीने त्याच दिवशी प्रत्येकी साडेबारा हजार रुपये याप्रमाणो 25 हजार रुपयांची भरपाई केली. ही नोकरी धोक्याची असल्याने संतोषच्या साथीदाराने सोडली. परंतु, संतोषने तिथेच जुळवून घेतले. मैत्रिणीसमोर झालेल्या अपमानाची सल कायम असलेल्या आकाशने त्याचा आणखी एक मित्र मंदार उतेकरला चेकमेटमध्ये होणा:या करोडो रुपयांच्या उलाढालीची माहिती दिली. त्याच काळात तिथे नोकरीला लागलेल्या अमोल कार्लेलाही त्यांनी हाताशी घेतले. .........अमोलने केली एक कोटीची मागणीया संपूर्ण कटात सहभागी होण्यासाठी तसेच आतील हालचालींची दरोडय़ापूर्वी आणि नंतर बित्तंबातमी देण्यासाठी अमोल कार्ले तयार झाला. पण, यासाठी संपूर्ण लुटीतील एक कोटीची रोकड द्यावी लागेल, असे त्याने आकाशला सांगितले. याच कटातील त्यांचा आणखी एक नाशिकचा साथीदार उमेश वाघ (पूर्वी लोकमान्यनगर येथे राहणारा) यानेही या योजनेत सहभागी होण्याचे मान्य केल्यानंतर दरोडय़ाचा कट रचला गेल्याची माहिती तपासात उघड झाल्याचे सूत्रंनी सांगितले.............पोलीस नातेवाइकाची घेतली शपथ..सुरुवातीलाच आकाशला गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि मदन बल्लाळ यांच्या पथकाने अटक केली, तेव्हा त्याने त्याची एक जवळची नातलग असलेली महिला पोलीस हवालदार हिची शपथ घेऊन सांगितले की, माझा या दरोडय़ात सहभाग नाही. तोर्पयत खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक एन.टी. कदम हेही त्याच्या मागावर होते. सुरुवातीला त्याच्यावर विश्वास ठेवून युनिट-5 ने त्याला सोडले. पण, अमोल कार्ले याच्याबरोबर 28 जून रोजी (दरोडय़ाच्या दिवशी) एसएमएसवरील संवादामुळे तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
कर्मचा:यांच्या चुकीमुळे 25 हजार रुपये गहाळ झाले होते. कर्मचा:यांच्या चुकीचा फटका कंपनी का सहन करेल? त्यामुळेच त्यांना ते पैसे त्याच दिवशी भरण्यास सांगण्यात आले होते, अशी माहिती ह्यचेकमेटह्णचे मुंबईतील व्यवस्थापक शरद शेट्टी यांनी ह्यलोकमतह्णला दिली. नियमानुसार त्यांनी त्याच दिवशी पैसे भरणो अपेक्षित होते. त्यात त्यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. आता ही टोळी अशा बनावट कहाण्या रचून सांगत असल्याचेही ते म्हणाले.