शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

‘शतरंज के खिलाडी’पासून ‘भविष्य’पर्यंत

By admin | Published: November 17, 2015 1:19 AM

सईद जाफरी यांचा जन्म ९ जानेवारी १९२९ रोजी पंजाबमधील मलेरकोटला शहरात सामन्य कुटुंबात झाला. त्यांनी शालेय शिक्षणानंतर मसुरी व अलाहाबादेत शिक्षण घेतले. त्यांचा कल सुरवातीपासूनच

मुंबई : सईद जाफरी यांचा जन्म ९ जानेवारी १९२९ रोजी पंजाबमधील मलेरकोटला शहरात सामन्य कुटुंबात झाला. त्यांनी शालेय शिक्षणानंतर मसुरी व अलाहाबादेत शिक्षण घेतले. त्यांचा कल सुरवातीपासूनच रंगभूमीकडे होता. नवी दिल्लीत येऊन त्यांनी आपला ‘युनिटी’ हा नाट्यगट सुरू केला. या गटात त्यांनी शेक्सपिअर आणि इतर मान्यवर इंग्रजी नाटककारांच्या कलाकृती सादर केल्या. सईद जाफरींनी कधी त्या नाटकांत मुख्य भूमिका साकारली नाही तर छोट्या भूमिका करून ते आपली अभिनयाची हौस भागवून घेत. नंतर ते लंडनला गेले. तेथे त्यांना मोठ्या नाट्यशाळेत शिष्यवृत्ती मिळाली. लंडननंतर ते याच क्षेत्रातील शिक्षणासाठी अमेरिकेलाही गेले. तेथे अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर ते चित्रपटांकडे वळले.सईद जाफरी यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या मदतीने सुरू झाला. रे यांनी ‘शतरंज के खिलाडी’ हा एकमेव हिंदी चित्रपट केला. त्यात जाफरी यांच्यासोबत संजीवकुमार होते. आपल्या अभिनयाची चुणूक त्यांनी संजीवकुमार यांना दाखविली. त्यानंतर ते रिचर्ड एटनबरो यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गांधी’मुळे चर्चेत आले. ‘गांधी’मध्ये त्यांनी सरदार पटेल यांची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. त्यांनी बॉलिवूड, लंडन आणि अमेरिकन चित्रपटांत कौशल्य सिद्ध केले.प्रमुख चित्रपट : जाफरी यांनी जवळपास ८० चित्रपटांत भूमिका केल्या. त्यात इंदर कुमार यांचा ‘दिल’, सुभाष घई यांचा ‘रामलखन’, राजकपूर यांचा ‘हीना’ व ‘राम तेरी गंगा मैली’, शेखर कपूरचा ‘मासूम’, सई परांजपे यांचा ‘चष्मेबद्दूर’, यश चोपडा यांचा ‘मशाल’, रमेश सिप्पी यांचा ‘सागर’, राकेश रोशन यांचा ‘खुदगर्ज’, पंकज पराशर यांचा ‘चालबाज’, के. विश्वनाथ यांचा ‘ईश्वर’, राजकंवर यांचा ‘जान’ आणि ‘जुदाई’, डेव्हीड धवन यांचा ‘दिवाना मस्ताना’ हे प्रमुख चित्रपट. २००६ मध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट ‘भविष्य’ प्रदर्शित झाला.कौटुंबिक जीवन : जाफरी यांचे दोन विवाह झाले. १९५८ मध्ये ते मधुर जाफरी यांच्याशी विवाहबद्ध झाले. १९६५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. १९८० मध्ये त्यांनी जेनिफर हिच्याशी लग्न केले. याच वर्षी जेनिफरचे निधन झाले. तिच्या जाण्यामुळे सईद जाफरी खूपच एकाकी झाले. त्यांना मीरा, जिया व साकिया जाफरी या तीन मुली होत्या. साकिया जाफरी लंडनमध्ये रंगभूमीवर सक्रिय आहे. जाफरी यांच्या निधनाने रंगभूमीसह हिंदी आणि इंग्रजी चित्रपटसृष्टीत अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता हरपला आहे. व्यावसायिक आणि कलात्मक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटात त्यांनी अभिनयाचा ठसा उमटविला होता. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री