शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

छगन भुजबळांच्या ठोक्यांची तपासणी सुरू

By admin | Published: October 31, 2016 5:37 AM

आॅर्थर रोड कारागृहात असलेले माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमितता आहे.

मुंबई : आॅर्थर रोड कारागृहात असलेले माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमितता आहे. हृदयाच्या ठोक्यांतील अनियमिततेचे कारण शोधून काढण्यासाठी रविवारी केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी ‘हॉल्टर मॉनिटरिंग टेस्ट’ सुरू केली आहे. ही तपासणी २४ तास करण्यात येते. सोमवारी ही तपासणी पूर्ण झाल्यावर निदान होईल, अशी माहिती जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. सप्टेंबर महिन्यात ताप आल्यामुळे भुजबळांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी व्हायरल फीवर बरोबरच त्यांना हृदयाचा त्रास जाणवू लागला होता. त्यांच्या हृदयाचे ठोके कमी पडत होते. औषधोपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. शुक्रवार, २८ आॅक्टोबरला सायंकाळी पुन्हा एकदा छातीत दुखू लागल्याने भुजबळांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. भुजबळ यांचे सातत्याने हृदयाचे ठोके क3मी पडत असल्याने, त्याचा वेग जाणून घेण्यासाठी हॉल्टर मॉनेटरिंग टेस्ट केली जात आहे. ही टेस्ट जे. जे. रुग्णालयात केली जात असून, केईएममधील डॉक्टर जे. जे.मध्ये आले होते. रविवारी या तपासणीला सुरुवात करण्यात आली. या तपासणीत हृदयाच्या ठोक्यांची आणि हृदयाच्या हालचालीची नोंद घेतली जाते. छोटे डिवाइस संगणकाशी जोडून नोंदणी केली जाते. या तपासणी अहवालानंतर त्यांना नक्की काय झाले आहे, याचे निदान करण्यात येईल, असेरुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. भुजबळ यांना बुधवार, २६ आॅक्टोबरला कारागृहात अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर, त्यांना जे. जे. रुग्णालयात आणल्यावर, गॅसचा त्रास असल्याचे निदान झाले. (प्रतिनिधी)