शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल
2
"आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद", हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा
3
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
4
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
5
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
6
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
7
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
8
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
9
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
10
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
11
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
12
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
13
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
14
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
15
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
16
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
17
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
18
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
19
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
20
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला; म्हणाले, "त्यांचा अभ्यास कमी, उगीच काही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 1:39 PM

मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वार सुरु आहे. मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे. त्यांनी आधी अभ्यास करावा. मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली आहे.

छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. मुस्लीम समाजातील काही घटकांना २५ वर्षांपूर्वी आरक्षण दिलेले आहे. मनोज जरांगेचा अभ्यास कमी आहे. उगीच माहीत काही नसतंय बोलायचं म्हणून उगी बोलायचं. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाबद्दल खुश करण्यासाठी बोलायचं, असे छगन भुजबळ म्हणाले.

इम्पीरिकल डेटाबद्दलही छगन भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, १९९१ पासून समता परिषदेची मागणी होती. २०१६ साली माहिती गोळा झाली. मात्र पुढे आकडेवारी जाहीर झालेली नाही. आमचे म्हणणे आहे की, सेन्सर्स कमिशनकडून ती माहिती गोळा केली पाहिजे. कारण त्यांच्याकडून जेव्हा माहिती गोळा होते, त्यात चुकीची माहिती कुणी दिली तर त्याला शिक्षा आहे. रखडलेल्या दशवर्ष जनगणनेत जात गणना करा, ही आमची मागणी असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

याचबरोबर, आमदारांच्या निधी वाटपाबाबत छगन भुजबळ म्हणाले, अजून कुणालाही ही काही मिळाले नाही. विकासकांसाठी पैसे मिळतात. उगाच मोठ्या प्रमाणात दान मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. आचारसंहितेमुळे सर्व निर्णय पेंडिग आहेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. याशिवाय, मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मला काहीच अपेक्षा नाही. खाते अपडेट वगैरे काही नाही. मला फक्त लोकांची काम करायची आहेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

काय म्हणाले होते मनोज जरांगे-पाटील?राज्यात काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार या समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी निघाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय व्हायला नको. मुस्लिमांची सरकार दरबारी कुणबी नोंद निघाली असेल, तर राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले. तसेच, त्यांना आरक्षण कसे मिळत नाही, तेच मी बघतो, असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण