शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

“फडणवीस काय करणार?”; कल्याण गोळीबारप्रकरणी भुजबळांचा सुप्रिया सुळेंना प्रतिप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 1:51 PM

Chhagan Bhujbal News: सत्यपरिस्थिती पाहावी लागेल. नाहीतर आंतरवाली सराटीसारखे होईल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal News: उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.

मी या घटनेचा निषेध करते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्याने कुणी गोळीबार केला त्यांना कडक शिक्षा व्हावी. या घटनेमागे काहीही कारण असले तरी गोळीबार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पोलिसांच्या समोरच जर गोळीबार होत असेल तर ही सत्तेची मस्ती नाहीतर काय आहे?, असा उद्विग्न सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यासंदर्भात छगन भुजबळ यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

देवेंद्र फडणवीस काय करणार?

देवेंद्र फडणवीस यांचा काय संबंध? देवेंद्र फडणवीस काय करणार? त्यांनी गोळीबार करण्यास सांगितले का? दोघांच्या वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचे दिसत आहे. देशभरात असे प्रकार घडत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मलाही एक आमदार किती शिव्या घालतो, घाणघाण बोलतो, मारायची-कापायची भाषा वापरतो. त्याला फडणवीस काय करणार? फडणवीस एवढेच करू शकतात की, काही झाल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करू शकतात, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ही बातमी पाहिली, तेव्हाच मला आश्चर्य वाटले. हे कशामुळे झाले, त्यांच्यामध्ये एवढा संताप का होता? याची माहिती समोर आलेली नाही. जे जखमी झाले आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. आताच या प्रकरणावर अधिक काही बोलणार नाही. कारण सत्यपरिस्थिती पाहावी लागेल. नाहीतर आंतरवाली सराटीसारखे होईल. आंतरवाली सराटीमध्ये असेच झाले होते. आधी तिथे दगडफेक झाली, ८० जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पण सर्वांसमोर पहिला भाग आलाच नाही, दुसरा भागच आला. त्यामुळे उल्हासनगरच्या प्रकरणात नेमके काय घडले, हे पाहावे लागेल. प्रत्यक्षदर्शी लोक याबाबत अधिक माहिती देऊ शकतील, असे भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेChhagan Bhujbalछगन भुजबळ