शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

Union Budget 2022 : "अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा; महागाईचा दर वाढत असताना करदात्यांची घोर निराशा"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 4:02 PM

Chhagan Bhujbal Slams Modi Government Over Union Budget 2022 : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्प सादर करतांना निव्वळ आकडेवारीचा खेळ केलेला दिसतो.

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या भाषणातून अर्थसंकल्प सादर केला खरा मात्र निव्वळ घोषणाबाजी पलीकडे ठोस काहीही मिळाले नसून केंद्राने अर्थसंकल्पातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा केली आहे. केंद्राचा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘खोदा पहाड आणि निकाला चूहा’ असल्याची टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली आहे. 

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्प सादर करतांना निव्वळ आकडेवारीचा खेळ केलेला दिसतो. यातून हाती काही न लागता यात फक्त फुगवलेले आकडे दिसतात प्रत्यक्षात जनतेच्या हाती काय लागेल हा प्रश्नच असून  किमान निवडणूक संकल्प म्हणून तरी जनतेला दिलासा देणे गरजेचे होते. काही राज्यात निवडणुका असतांना सर्वसामान्यांना या बजेटमधून काही लाभ होईल असे मला वाटले होते. मात्र केंद्राने फक्तच फुगीर आकडे दाखवले सर्वसामान्यांच्या वाट्याला मात्र भोपळाच आला असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, केंद्राला जानेवारीमध्ये २०२२ मध्ये १ लाख ४० हजार ९८६ कोटी एवढा जीएसटी मिळाला असे अर्थमंत्री सांगतात मग राज्यांचा जीएसटी त्यांना का दिला जात नाही हे मात्र न उलगडनारे कोड आहे. गेले दोन वर्ष संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत असून कोरोना काळात ४ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र केंद्राने आजच्या बजेटमध्ये फक्त ६० लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच देशातील बेरोजगारांना नोकरी देण्यास सरकार सफशेल अपयशी ठरल्याचे दिसते आहे. असंघटीत कामगार शेतमजूर यांना याचा सर्वाधिक फटका बसला मात्र त्यांच्यासाठी कुठलीही विशेष तरतूद यामध्ये दिसून येत नाही. कोरोनाकाळात तयार झालेली गरीब श्रीमंत दरी कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केला गेला नाही. मागच्या अर्थसंकल्पात विकासदर ११ टक्के पर्यंत दाखवला होता ह्या अर्थसंकल्पात मात्र ९.२ दाखवला आहे. नरेगा (राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) मध्ये अनेक लोकांनी काम केले. मात्र नरेगाचा उल्लेख सुद्धा या अर्थसंकल्पात नाही. अर्थसंकल्पातून कष्टकरी वर्गाच्या तोडाला पाने पुसली असून कुठलीही ठोस हमी केंद्र सरकारने दिलेली नाही. तसेच देशाच्या संरक्षणावरील सुद्धा निधी कमी केला ही देखील चिंताजनक बाब असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांना करसवलतीच्या माध्यमातून दिलासा देण्याची आवश्यकता होती. मात्र गेल्या पाच अर्थसंकल्पाप्रमाणे यंदाच्या सहाव्या अर्थसंकल्पात देखील त्यात कुठलाही बदल गेला न गेल्याने सर्वसामान्य करदात्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षात कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी यंदाही निराशा पडली आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद या अर्थसंकल्पातून होईल अशी अशा होती मात्र त्यांच्याही पदरी निराशा पडली आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर सरकारने एकीकडे खतांवरील सबसिडी बंद करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले, आणि आता म्हणता एमएसपी वाढवणार असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांचा शेती उत्पादनातला खर्च अधिक असताना शेतकऱ्यांना कोणताही दिलासा या सरकारने दिलेला नाही. जेष्ठ नागरिकांच्या समस्येकडे देखील केंद्र सरकारने कानाडोळा केला आहे. जेष्ठ नागरिकांसाठी देखील कोणतीच सुविधा दिली नाही.  निव्वळ आपल्या भाषणातून भूलभूलय्या करत सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी निरशा देण्यापलीकडे सरकारच्या अर्थसंकल्पात ठोस काही दिसत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Chagan Bhujbalछगन भुजबळNarendra Modiनरेंद्र मोदी