मुंबई: आज देशभरात श्री गणेशाचे जल्लोषात आगमन होत आहे. अनेकजण या गणरायाचे दर्शन घेत आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आज अंजिरवाडी येथील गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देशावरील कोरोनाचं संकट दूर करण्यासोबतच काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोगही दूर कर, असं साकडं बाप्पाला घातल्याचे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळांनी आज अंजिरवाडीतील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना देवाकडे काय मागितलं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, पहिल्यांदा कोरोना दूर कर आणि त्यानं काही लोकांच्या मनातील रोग दूर करुन सर्वांना शारीरिक आणि मानसिकृष्ट्याही निरोगी कर, असं साकडं घातल्याचं भुजबळ म्हणाले.
ईडी केंद्राचा पपेटभुजबळांनी यावेळी देशातील ईडीच्या कारवाईवरही बोट ठेवलं. मागे एकदा सर्वोच्च न्यायालय म्हणाले होते की, सीबीआय हा पपेट आहे. पण, आता ईडी हा केंद्र सरकारचा दुसरा पपेट आहे. ईडीचा एवढा दुरुपयोग कधीही झाला नव्हता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही तेच सांगितलं. शिवसेनेच्या स्थापनापासून मी राजकारणात आहे. कधी यांचं तर कधी त्यांचं सरकार आलं. वाजपेयींचंही सरकार आलं. पण अशी वागणूक कधीच दिली नाही, असं ते म्हणाले.
न्यायालयाच्या निकालावर भाष्ययावेळी भुजबल यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या निकालावरही भाष्य केलं. 'गणपती आशीर्वाद देतात. त्यामुळेच मला न्याय मिळत चालला आहे. आणखीही न्याय मिळेल. महाराष्ट्र सदन हे बेसिक आहे, बाकीच्या केसेस या त्याच पायावर उभ्या आहेत. इकडून तिकडून या केसेस तयार केल्या आहेत. न्यायदेवतेलाही ते माहीत आहे, असंही ते म्हणाले.