पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, भविष्यात देखील अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, अशी खात्री खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राजकीय क्षेत्रात उधाण आले होते. भुजबळांनी देखील आपण कोणत्याही पक्षात प्रेवश करणार नसून राष्ट्रवादीत राहणार असल्याचे ठामपणे सांहितले होते. मात्र, तरीदेखील त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा कााही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. परंतु पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, सध्या सत्ताधारी पक्षांकडून विनाकारण सुरु असलेल्या ईडीची कारवाई, बँका, कारखान्यांची चौकशीमुळे लोक धास्तावले असून, या धास्तीपोटी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी पक्षावर अथवा पवार कुटुंबियावर नाराजी म्हणून कोणी पक्ष सोडून जात नाहीत. पक्ष सोडून जाणा-यापैकी काहींनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. यामुळे त्यांचा द्वेष न करता त्यांना शुभेच्छाच देते. सुळे म्हणाल्या, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका नेत्याच्या वडिलांना भाजपने प्रवेश नाकारल्याचे ऐकायला मिळाले. वडिलांचा अवमान झालेला असतानाही हे नेते भाजपमध्ये गेले. चाळीस वर्ष एका पक्षात राहिलेल्या आणि विचारांशी बांधील असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मुलांसाठी मानहानी पत्करावी लागते हे दुर्दैव आहे.
छगन भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 10:55 AM
चाळीस वर्ष एका पक्षात राहिलेल्या आणि विचारांशी बांधील असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मुलांसाठी मानहानी पत्करावी लागते हे दुर्दैव आहे..
ठळक मुद्देपक्ष सोडून जाणा-यापैकी काहींनी पक्षासाठी मोठे दिले योगदान विनाकारण सुरु असलेल्या ईडीची कारवाई, बँका, कारखान्यांची चौकशीमुळे लोक धास्तावलेले