ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारत बांधकाम कंत्राटात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने गोत्यात आलेले छगन भुजबळ यांच्या अडचणीत भर पडली आहे. महाराष्ट्र सदनातील कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पोलिसांनी छगन भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळ व अन्य १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र सदनचे कंत्राट घेतलेल्या चामणकर एंटरप्रायझेसने कंत्राटापोटी मिळालेल्या पैशांमधील काही रक्कम भुजबळ व त्यांच्या नातेवाईकांचे वर्चस्व असलेल्या कंपन्यांना दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून याप्रकरणी चौकशी सुरु होती. अखेरीस पोलिसांनी गुरुवारी छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. भुजबळ यांच्याविरोधात आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.