ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १७ - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) दोन दिवसांची कोठडी आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
न्यायालयात हजर करण्याआधी छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांची एकत्र चौकशी करण्यात आली. सक्तवसुली संचलनालयात (ईडी) ही चौकशी करण्यात आली. तब्बल 4 तास ही चौकशी चालली. त्यानंतर समीर भुजबळ यांची पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली. तर छगन भुजबळांना न्यायालयात हजर केले गेले. 11 तासांच्या मॅरेथॉन चौकशींनतर अंमलबजावणी संचलनालयाने छगन भुजबळ यांना 14 मार्च रोजी अटक केली होती.