मुंबई : भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. यावेळी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. त्यावरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच, यावरून सध्या राजकारण सुरू झाले आहे. यात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली असून त्यांनी ट्विटरवरून भाजपा आणि संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? असा सवाल करत भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. याशिवाय, शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदीची अद्याप घोषणा नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेनंतर भाजपाने त्यांना 'जय श्री राम' लिहून दहा लाख पत्रे पाठवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी या मुद्द्यावरून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना २० लाख पत्रे पाठवण्याची तयारी दर्शविली आहे.
आणखी बातम्या...
बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...
राम मंदिराचे भूमिपूजन अशुभ मुर्हूतावर? शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींकडून प्रश्नचिन्ह
जोपर्यंत शाळा बंद आहेत, तोपर्यंत फी नाही; गुजरात सरकारचा पालकांना दिलासा
मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान
चीनविरोधात जागतिक आघाडी, अमेरिकेने घेतली अशी भूमिका
"मी म्हणजे ट्रम्प नाही..." उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा प्रोमो रिलीज