शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

छत्तीसगडचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बनले महाराष्ट्रात डॉक्टर

By admin | Published: January 02, 2015 12:47 AM

गडचिरोली या नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यात शासकीय सेवेचे वैद्यकीय अधिकारी येऊन सेवा बजावत नसल्याने छत्तीसगड राज्यातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांचा वैद्यकीय व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष : एटापल्ली तालुक्याच्या शेकडो गावात बहरला व्यवसायए. आर. खान - अहेरी (गडचिरोली)गडचिरोली या नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यात शासकीय सेवेचे वैद्यकीय अधिकारी येऊन सेवा बजावत नसल्याने छत्तीसगड राज्यातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांचा वैद्यकीय व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फोफावत चालला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाची आरोग्यसेवा याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील रूग्णांच्या जीवाशी सध्या खेळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून एटापल्ली, भामरागड, कोरची, सिरोंचा या तालुक्याच्या सीमा येतात. हा गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलीदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. या भागात शासनाच्या आरोग्यसेवेशिवाय दुसरी आरोग्य सेवा नाही. शासनाच्या आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तर काही दुर्गम गावातील लोक आरोग्य केंद्रापर्यंत दळणवळणाची साधने नसल्याने पोहोचत नाही. अशा परिस्थितीत छत्तीसगड राज्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर असलेले अनेक तरूण गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली, कोरची, सिरोंचा आदी भागातील दुर्गम गावांमध्ये जाऊन वैद्यकीय व्यवसाय विनापरवानगी करीत आहे. यांच्याकडे वैद्यकीय शास्त्राची कोणतीही डिग्री नसल्याचे दिसून येत असतानाही या बोगस डॉक्टरांचा धंदा दुर्गम भागात फोफावत चालला आहे. एटापल्ली तालुक्याच्या गट्टा परिसरातील ताडगुडा येथे ५० ते ६० लोकसंख्येच्या गावात छत्तीसगडचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ घरपोच आरोग्यसेवा देण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले व मनमानी फी आकारून गरीब आदिवासींचे आर्थिक शोषण करीत आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला या गंभीर प्रकाराची साधी माहितीही नाही. जिल्ह्यात बोगस डॉक्टर नसल्याचा दावा हा विभाग सातत्याने करीत आहे. दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याने नाईलाजास्तव नक्षलग्रस्त भागातील लोकांना आरोग्य तपासणी छत्तीसगडच्या बोगस डॉक्टरांकडून करावी लागत आहे. त्यामुळे अनेक लोकांचे चुकीच्या उपचारामुळे जीवही जाण्याच्या घटना घडलेल्या आहे. यांच्या हातून उपचार झालेले सिरिअस पेशन्टनंतर अहेरी किंवा गडचिरोली येथे आणले जातात, असे दिसून येते.