शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

छोटा राजनची पथकाकडून बालीत कसून चौकशी

By admin | Published: November 04, 2015 1:58 AM

कुख्यात डॉन छोटा राजन याची येथे आलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या पोलीस पथकाने मंगळवारी कसून चौकशी केली. यावेळी भारतीय उच्चायुक्तालयातील अप्पर सचिव संजीव अग्रवाल

बाली : कुख्यात डॉन छोटा राजन याची येथे आलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या पोलीस पथकाने मंगळवारी कसून चौकशी केली. यावेळी भारतीय उच्चायुक्तालयातील अप्पर सचिव संजीव अग्रवाल खासकरून उपस्थित होते. छोटा राजनला २५ आॅक्टोबरला बाली बेटावर अटक करण्यात आली होती. आॅस्ट्रेलियातून इंडोनेशियाला येताच विमानतळावर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. फरार झाल्यापासून छोटा राजन प्रथमच भारतीय अधिकाऱ्यांच्या हाती लागला असून गेल्या २० वर्षांत त्याची प्रथमच चौकशी झाल्याचे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. राजनला लवकरच स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. स्थानिक पोलीस भारताला राजन का हवा आहे याची माहिती न्यायालयाला देतील. राजनचे लवकरच भारताला प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे एका भारतीय अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले होते. राजनचा ताबा मिळविण्यासाठी भारतीय पथक इंडोनेशियन समपदस्थांसोबत काम करत आहे. भारतीय पथकात सीबीआय, मुंबई आणि दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रविवारी येथे दाखल झालेल्या या पथकाकडे राजनच्या संपूर्ण गुन्हेगारीची कुंडली आहे. या पथकाने इंडोनेशियन पोलिसांसमक्ष सोमवारी राजनची चौकशी केली. जकार्तातील भारतीय उच्चायुक्तालयाचे अप्पर सचिव संजीव कुमार अग्रवाल यांनी रविवारी राजनची भेट घेतली होती. त्यांनी राजनशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. भारतीय पथकाने राजनची जेव्हा चौकशी केली तेव्हा अग्रवाल तेथे उपस्थित होते. तीन शार्पशूटर्सना अटकछोटा राजनच्या टोळीतील तीन शार्प शूटर्सना उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) मंगळवारी अटक केली. एसटीएफचे महानिरीक्षक सुजीतकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आरोपींची नावे लगेचच समजू शकली नाहीत. मात्र, राजनच्या अटकेनंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. प्रत्यार्पण लांबणीवर?डेन्सपर इमिग्रेशनचे प्रमुख आणि जकार्ता इंटरपोलने बाली पोलीस मुख्यालयात राजनची आज चौकशी केली. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी देण्यात आली. प्रत्यार्पण आजच होऊ घातले होते. तथापि, राजनला ठेवण्यात आलेल्या डेन्सपर डिटेंशन सेंटरजवळील माऊंट रिनजानी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली असून त्यामुळे राजनची वापसीही लांबणीवर टाकावी लागल्याचे सांगण्यात येते. ७५ हून अधिक गुन्हेराजनविरुद्ध अमली पदार्थांची तस्करी, खंडणी उकळणे, हत्या यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तब्बल ७५ गुन्ह्यांत तो हवा आहे. छोटा राजनचा साथीदार नीलेश पराडकर जाळ्यातमुंबई : छोटा राजनचा उजवा हात समजला जाणारा नीलेश दिनकर पराडकर ऊर्फ शतल्या याला मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात आल्यानंतर मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. नीलेश पराडकर आणि अन्य एक गँगस्टर रघू शेट्टी यांनी भांडूपमधील एका बिल्डरला १५ कोटी रुपये मागितले होते. याच प्रकरणात नीलेश पराडकरला अटक करण्यात आल्याचे सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले. खंडणी वसुलीप्रकरणी नीलेश पराडकर हा वाँटेड होता. मुंबईत पकडले; बिल्डरला मागितली होती खंडणी- नीलेशने ५ सप्टेंबर रोजी छोटा राजनच्या इशाऱ्याहून या बिल्डरला खंडणी मागितली होती. या बिल्डरने वडाळा एसआरए प्रोजेक्टअंतर्गत हे काम घेतलेले आहे. - या प्रकरणी नीलेश पराडकरवर कलम ४५२ , ३८७ , ३४ भादंवि आणि आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्वालामुखीच्या वादळामुळे डेन्पसार (बाली ) येथून विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे राजनचे भारतात येणे लांबणीवर गेले.छोटा राजनला मुंबईला आणणारमुंबई : छोटा राजनला बालीतून मुंबईत आणण्यात येणार असल्याच्या वृत्तास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुजोरा दिला. ताज्या घडामोडींच्या दृष्टिकोनातून सुरक्षाव्यवस्था आवळण्यात आली आहे, असे फडणवीस म्हणाले. राजनला मुंबईत आणण्यात येणार असले तरी त्याला बालीहून थेट येथे आणण्यात येणार की, दिल्लीमार्गे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही.