नवी दिल्ली : मुंबईतील १९९३ च्या बॉम्स्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यात आल्याने दाऊद इब्राहिमची‘डी’ कंपनी बिथरली आहे. भारत सरकारने याकूबला धोका दिला असून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा फुत्कार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा घनिष्ठ सहकारी छोटा शकील याने काढला आहे. त्याच्या या वक्तव्याची मुंबई पोलिसांनी तसेच महाराष्ट्र एटीएसने गंभीर दखल घेतली आहे. याकूबची फाशी ही कायद्याची हत्या असल्याचा आरोप करून शकील म्हणाला, याकूबला धोका देऊन सरकारने दाऊद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या घरवापसीचे सर्व मार्ग बंद केले आहेत. दाऊदने आत्मसमर्पण केले असते तर त्याच्यासोबतही असेच घडले असते हे आता स्पष्ट झाले आहे. दाऊद आणि याकूबचा भाऊ टायगर हे दोघे मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहेत. त्यांनीच या स्फोटांचे षडयंत्र रचले होते. टायगरच्या गुन्ह्णांची शिक्षा याकूबला देऊन भारत सरकारने काय संदेश दिला? असा सवालही त्याने उपस्थित केला.तो म्हणाला, आता भविष्यात कुणीही सरकारकडून चॉकलेट खरेदी करणार नाही. कुणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. दाऊद आणि याकूबच्या संबंधांचाही त्याने इन्कार केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्याकूबच्या आत्मसमर्पणावर बोलताना तो म्हणाला की, त्याच्या कुटुंबाकडे दुबईचा व्हिसा होता. त्याने कुटुंबासह आत्मसमर्पण केले. कुणासाठी? या फाशीने तुम्ही काय साधले? त्याची पत्नी तान्हुल्या मुलीसह आली होती आणि कारागृहात राहिली. याला न्याय म्हणायचे काय? त्याने मदत केली आणि बदल्यात त्याला काय मिळाले?च्याकूबच्या फाशीने दहशतवाद्यांना संदेश मिळेल,असे वक्तव्य ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले होते. याचा उल्लेख करून आम्हाला संदेश देण्यासाठी तुम्ही निर्दोषांना फासावर लटकवित आहात,असा आरोप छोटा शकीलने केला. ‘त्या’ दहा जणांची फाशी रद्दच- १९९३ बॉम्बस्फोटासाठी दोषी धरत याआधी विशेष टाडा न्यायालयाने ११ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्च न्यायालयाने यातील दहा आरोपींची फाशी रद्द करून त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर याकूबची फाशी कायम केली. सध्या खटला सुरू असलेल्या आरोपींवर गंभीर आरोप असल्याने आता विशेष न्यायालय त्यांना फाशीची शिक्षा ठोठावणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.हे ते दहा आरोपी - १. झाकीर हुसेन नूर मोहम्मद शेख२. अब्दुल खान ऊर्फ याकूब खान अख्तर खान३. फिरोज ऊर्फ अक्रम अमानी मलिक४. मोहम्मद मुश्ताक मोसा तरानी५. असगर युसूफ मुकादम६. शाहनवाज अब्दुल कादर कुरेशी७. मोहम्मद शोएब मो.कासम घनसार८. अब्दुल गनी इस्माईल तुर्क९. परवेझ नाझिर अहमद शेख१०. मोहम्मद फारुख मोहम्मद युसूफ पावले
छोटा शकीलची भारताला धमकी
By admin | Published: August 01, 2015 1:44 AM