लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ़ बापूसाहेब कांडेकर यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या नावाने धमकी देऊन खंडणी मागणाऱ्याचा तोफखाना पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी मुंबई, पुणे व नाशिक परिसरात पथके रवाना करण्यात आली आहेत़ ज्या मोबाइल क्रमांकावरून खंडणीची धमकी आली होती त्याचे लोकेशन सतत बदलत असल्याने आरोपींना शोधण्यात अडचणी येत आहेत़ नोबल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी लॅण्डलाइन क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि छोटा शकीलच्या नावे धमकावित ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली़ या घटनेनंतर हिरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे़
छोटा शकीलच्या नावाने डॉक्टरला धमकी
By admin | Published: July 13, 2017 5:06 AM