शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
3
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
4
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
5
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
6
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
7
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
8
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
9
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
10
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
11
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
12
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
13
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
14
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
15
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
16
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
17
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
18
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
20
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया

झारखंडमध्ये २ तर महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक का? राजीव कुमार म्हणाले, "गेल्यावेळी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 4:40 PM

ख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका घेण्याचे कारण सांगितले आहे.

Maharashtra, Jharkhand Election Phase : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. तर झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंडच्या निवडणुकीचा निकालही २३ नोव्हेंबरला लागणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका घेण्याचे कारण सांगितले आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ५ जानेवारीला संपणार आहे. त्याआधी दोन्ही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र यावेळी पत्रकारांनी राजीव कुमार यांना झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका घेण्याबाबत विचारले. तसेच यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या मागणीबाबतही प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना राजीव कुमार यांनी याबाबत भाष्य केलं.

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राजीव कुमार हे मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन  त्यांच्या सूचना जाणून घेतल्या होत्या. यावेळी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका एकाच टप्प्यात घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदेसेना आणि अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली. कमी टप्प्यात मतदान घ्या, अशी उद्धव सेनेसुद्धा मागणी केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील निवडणूक एका टप्प्यात तर झारखंडमधील निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे.

"तुम्हाला माहिती आहे का गेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. झारखंड बद्दल काही गोष्टी आहेत. तिथे नक्षलींची समस्या असल्याने तिथे दोन टप्प्यात निवडणुका घेण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होत आहे," असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगJharkhandझारखंड